उर्वशीचं दुबईमध्ये बर्थडे सेलिब्रेशन; पार्टीत ओरी अन् उर्वशीचा डान्स ते रोमान्स
बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला नेहमीच कोणत्या ना कोणत्या गोष्टीमुळे चर्चेत असते. अलिकडेच तिच्या ‘डाकू महाराज’ चित्रपटाबद्दल बरीच चर्चा झाली होती आणि आता तिच्या आणि ओरीच्या लग्नाच्या बातम्या समोर येत आहेत. या सगळ्यामध्ये, उर्वशीची आणखी एक नवीन पोस्ट समोर आली आहे, जी तिच्या वाढदिवसाच्या पार्टीची आहे. या व्हिडिओमध्ये ती ओरीसोबत तिचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसत आहे. तसेच तिने ओरीसोबत तिच्या चित्रपटातील एका गाण्यावर डान्सही केला.
उर्वशीच्या बर्थडेची पार्टी आणि चर्चा
उर्वशीने 25 फेब्रुवारी रोजी तिचा 31 वा वाढदिवस साजरा करत आहे. दुबईमध्ये तिने आपल्या मित्रमंडळींसोबत बर्थडे साजरा केला आहे. तिच्या बर्थडे सेलिब्रेशनला तिने डायमंडचा ड्रेस घातला होता. तिच्या म्हणण्याप्रमाणे तिच्यासाठी हा खऱ्या हिऱ्यांचा ड्रेस बनवण्यात आला आहे. मात्र खरं पाहता तो ड्रेस छोट्या छोट्या आरशांपासून बनवलेला आहे. जरी, हा ड्रेस प्रत्यक्षात आरशापासून बनलेला असला तरी, उर्वशीने तो तिच्या आवडीनुसार कस्टमाइज केला असल्याचं तिने म्हटलं आहे.
बर्थडे पार्टीत खास लक्ष वेधलं ते ओरी आणि उर्वशीच्या डान्सने
तिच्या ड्रेसपेक्षाही जास्त चर्चा झाली ती तिच्या बर्थडेला हजर असलेल्या ओरीमुळे. गेल्या काही दिवसांपासून ओरी आणि उर्वशीच्या लग्नाच्या चर्चा होताना दिसत आहे. पार्टीत ओरी आणि तिने एकत्र केलेल्या ‘दब्दी दिब्दी’ नृत्याने देखील सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. पार्टीव्यतिरिक्त, दोघांनीही भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान स्टेडियममध्ये या गाण्यावर नाच केला होता. तथापि, त्यांच्या लग्नाच्या बातम्याही येऊ लागल्या मुळे या जोडीची जरा जास्तच चर्चा होऊ लागली आहे.
खरं तर, अभिनेत्रीने आदर जैन आणि अलेखा यांच्या लग्नाबद्दलच्या पोस्टवर कमेंट केली होती आणि ओरीलाही टॅग केलं होतं तसेच टॅग करत प्रश्न विचारला होता की ती त्याच्या लग्नाची वाट पाहत आहे, ज्यावर ओरीने उत्तर दिले, ‘आपले का’ असा रिप्लायही दिला होता. त्यामुळे आता ही जोडी खरंच लग्नबंधनात अडकणार आहे की या फक्त चर्चा आहेत पुढे समोर येईलच.
उर्वशीला तिच्या ड्रेसवरून ट्रोल
दरम्यान उर्वशीला तिच्या ड्रेसवरून ट्रोल करण्यात आलं. कारण तिने घातलेल्या ड्रेसच्या डिझायनरचाही तिने पोस्ट केलेल्या फोटोच्या कॅप्शनमध्ये उल्लेख केला आहे, ज्याच्या पेजवर हा ड्रेस आरशाचा बनवला गेल्याचं दिसून येत आहे, ज्याची किंमत 1 लाख 36 हजार रुपये आहे. आता ड्रेस खऱ्या हिऱ्यांनी कस्टमाइज केल्यानंतर त्याची किंमत किती असेल याचा अंदाज लावता येत नाही. उर्वशीच्या या पोस्टवर, लोकांनी कमेंट सेक्शनमध्ये ती खोट बोलत असल्याचं म्हणत तिला ट्रोल केलं आहे. तसेच अनेक युजर्सच्या मते तिचा ड्रेस हा खऱ्या हिऱ्यांचा नसून तो आरशांचाच आहे.अनेकांनी तिची खिल्ली उडवली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List