Pune crime news – शिरूरमधील कॅफेमध्ये तरुणाईची डिंगडांग

Pune crime news – शिरूरमधील कॅफेमध्ये तरुणाईची डिंगडांग

शिरूर शहरातील तरुण-तरुणींना अश्लील वर्तन करण्यास मुभा देणाऱ्या ‘द स्टीम रुम ‘या कॅफेचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कॅफेच्या मालकावर याअगोदर गुन्हा दाखल झाला असताना, त्यांनी पुन्हा हा कॅफे त्याचप्रकारे सुरू करून पोलिसांना एकप्रकारे आव्हान दिले होते.

आकाश रमेश लभडे (वय – 23, रा. अरणगाव, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) असे या कॅफेचालकाचे नाव आहे. याबाबत शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरूरचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांना शिरूर शहर व परिसरातील शाळेतील तसेच कॉलेजमधील मुला-मुलींना अश्लील वर्तन करण्यास मुभा देण्यासाठी’ द स्टीम रुम’ या कॅफेमध्ये अवैध पार्टीशन केले असून, त्यामध्ये काही शाळकरी मुले व मुली हे असभ्य व अश्लील वर्तन करीत असल्याबाबत माहिती मिळाली होती. त्यानुसार सदर कॅफेवर तत्काळ कारवाई करण्याबाबतचे आदेश मालकावर दुसऱ्यांदा गुन्हा दाखल अरणगाव, ता. पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी तपास पथकाला दिले होते.

त्यानुसार पोलीस हवालदार नाथसाहेब जगताप, महिला पोलीस हवालदार भाग्यश्री जाधव, पोलीस अंमलदार नितेश थोरात, रवींद्र आव्हाड हे साध्या वेशात शिरूर शहरामधील रेव्हेन्यू कॉलनी येथील या कॅफेमध्ये जाऊन नाष्टा ऑर्डर देऊन बसले असताना, तेथे काही मुले व मुली कॅफेचालकाने पार्टीशन केलेल्या रुममध्ये बसून असभ्य व अश्लील कृत्य करताना आढळून आले. तसेच अजून काही शाळकरी मुले व मुलीदेखील तेथे येत असल्याचे दिसून आले.

कॅफेचालक आकाश रमेश लभडे (वय – 23, रा. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) याच्यावर शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा भा. न्या. संहिता कायदा कलम 296 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याबाबत पोलीस अंमलदार रवींद्र बापूराव आव्हाड यांनी फिर्याद दिली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील अधिक तपास पोलीस हवालदार देविदास खेडकर हे करीत आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

संत तुकाराम महाराज यांच्या जगातील सर्वात मोठ्या पगडीचे अनावरण संत तुकाराम महाराज यांच्या जगातील सर्वात मोठ्या पगडीचे अनावरण
संत तुकाराम महाराजांच्या 375व्या बीज सोहळ्यानिमित्त जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या जगातील सर्वात मोठ्या पगडीचा लोकार्पण सोहळा मंगळवारी (दि. 11)...
कोल्हापुरातील ‘कुष्ठधाम’च्या वास्तूला आग
धक्कादायक… बांगलादेशींकडे हिंदुस्थानचे जन्म दाखले, हायकोर्टाने घेतली गंभीर दखल; बोगस कागदपत्रांच्या आधारे घेताहेत मतदान कार्ड
शिंदेंच्या आनंदाचा शिधा संपला! फडणवीसांचं ठरलंय… शिंदेंच्या योजना एकामागून एक गुंडाळण्याचा धडाका
गोरेंविरोधात तक्रार करणाऱ्या पीडित महिलेला पुन्हा धमक्या, तुषार खरातसारखे तुझेही हाल करू
लोकल ट्रेनवर फुगे फेकणाऱ्यांची खैर नाही! पोलिसांची करडी नजर; रेल्वे प्रशासन दंडात्मक कारवाई करणार
राज्यात तीन वर्षांत रस्ते अपघातांत 46 हजार जणांचा मृत्यू, ड्रग्ज सेवनाची चाचणी करण्यासाठी उपकरणे