धर्मेंद्र यांच्या 4 मुली, एकीचा घटस्फोट, काय काम करतात देओल कुटुंबाचे अन्य 3 जावई?

धर्मेंद्र यांच्या 4 मुली, एकीचा घटस्फोट, काय काम करतात देओल कुटुंबाचे अन्य 3 जावई?

Dharmendra 4 Daughter and Son in Law: बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र कायम त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात. धर्मेंद्र यांनी विवाहित आणि चार मुलांचे वडील असताना अभिनेत्री हेमा मालिनी यांच्यासोबत लग्न केलं. हेमा मालिनी आणि धर्मेद्र यांना दोन मुली आहे. पण धर्मेंद्र यांच्या चार मुली आणि जावयांबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. धर्मेंद्र यांनी दोन मुलं आणि चार मुली आहेत. तर आज धर्मेंद्र यांच्या चार मुली आणि जावयांबद्दल जाणून घेवू…

धर्मेंद्र यांनी वयाच्या 19 व्या वर्षी प्रकाश कौर यांच्यासोबत लग्न केलं. धर्मेंद्र आणि प्रकाश कौर यांना दोन मुलं आणि दोन मुली आहेत. सनी देओल, बॉबी देओल, अजीता देओल आणि विजेता देओल अशी त्यांच्या मुलांची नावे आहेत. सनी आणि बॉबी यांच्याबद्दल सर्वांना माहिती आहे. पण अजीता आणि विजेता यांच्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे.

अजीता देओल हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अजीता अनेरिका या देशात सायकोलॉजीची शिक्षिका आहे. अजिताचं लग्न किरण चौधरी नावाच्या भारतीय-अमेरिकन डेंटिस्टशी झालं आहे. अजिता आणि किरण यांना निकिता आणि प्रियांका चौधरी या दोन मुली आहेत.

धर्मेंद्र यांची प्रॉडक्शन कंपनी विजेता प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेड हे त्यांच्या मुलीच्या नावावर आहे. विजयाचं लग्न विवेक गिलसोबत झालं आहे. विजेता आणि विवेक यांच्या मुलाचे नाव साहिल आणि मुलीचे नाव प्रेरणा आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, विजेता दिल्लीत तिच्या कुटुंबासह राहते. विजेता राजकमल होल्डिंग्स अँड ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालक आहेत.

धर्मेंद्र यांच्या तिसऱ्या मुलीचं नाव ईशा देओल असं आहे. ईशा देओल हिचं लग्न 2012 मध्ये उद्योजक भरत तख्तानी याच्यासोबत झालं. भरत त्याच्या नातेवाईकांसह आरजी बँगल्स प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी चालवतो. मात्र, दोघांचं लग्न फार काळ टिकलं नाही. दोघांनी लग्नाच्या 12 वर्षानंतर वेगळं होण्याचा निर्णय घेतला आणि 2024 मध्ये घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतर ईशा एकटीच मुलींचा सांभाळ करते.

अहाना देओल ही धर्मेंद्र यांची सर्वात लहान मुलगी आहे. अहाना हिचं लग्न दिल्ली येथील उद्योजक वैभव वोहरा याच्यासोबत झालं आहे. दोघांना जुळ्या मुलगी अस्त्रिया – आदिया आणि एका मुलगा डेरियन आहे. सांगायचं झालं तर, धर्मेंद्र यांच्या तीन मुलींना बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं नाही. ईशा देओल हिने फक्त बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

महाराष्ट्र होरपळला, उष्माघाताचा पहिला बळी, धरणातील जलसाठा झाला कमी महाराष्ट्र होरपळला, उष्माघाताचा पहिला बळी, धरणातील जलसाठा झाला कमी
होळी संपल्यानंतर उन्हाचा पारा वाढला आहे. महाराष्ट्र होरपळला आहे. उन्हामुळे अंगाची लाही लाही होत आहे. जणू राज्यावर सूर्य देव कोपला...
‘डाळ पुरावी म्हणून जास्त पाणी घालायचो…’ शाहरुख खानने सांगितला तो बालपणीचा संघर्ष
“मला अशी पत्नी नको जी..”; अमिताभ बच्चन यांनी लग्नापूर्वी ठेवली होती ‘ही’ अट, जया यांच्याकडून खुलासा
मुस्लीम पत्नीसाठी हिंदू अभिनेता करतोय रोजा; इस्लामबद्दल म्हणाला “खूप कठीण..”
Katrina Kaif- कतरिना कैफ का गेली पाकिस्तानला? वाचा सविस्तर
आयाराम गयाराम… कोर्टाने हस्तक्षेप केला नाही तर ते 10व्या अनुसूचीची थट्टा ठरेल! महाराष्ट्रातील राजकारणावर SC ची महत्त्वाची टिप्पणी
स्तन दाबने बलात्कार नाही, ‘या’ निर्णयावरून सर्वोच्च न्यायालयाने न्यायमूर्तींना झापले; म्हणाले अत्यंत असंवेदनशील आणि…