सानिया मिर्झासोबत घटस्फोट, शोएब मलिकची तिसरी पत्नी गरोदर? ‘त्या’ व्हिडीओमुळे सर्वत्र चर्चा
भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा हिचा पाकिस्तानचा क्रिकेटर शोएब मलिक (Shoaib Malik) याच्यासोबत असलेला संसार मोडला आहे. गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र फक्त आणि फक्त शोएब – सानिया यांच्या नात्याची चर्चा रंगली आहे. सानिया हिच्यासोबत घटस्फोट झाल्यनंतर शोएब याने तिसरं लग्न पाकिस्तानची अभिनेत्री सना जावेद हिच्यासोबत केलं. सना हिच्यासोबत शोएब आता आनंदी वैवाहिक आयुष्य जगत आहे. आता पुन्हा शोएब मलिक तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. सना जावेद हिच्या प्रेग्नेंसीच्या चर्चांना उधाण आलं आहे.
सध्या सना जावेद हिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अभिनेत्रीची वागणूक पाहून ती प्रेग्नेंट असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. सांगायचं झालं तर, सना जावेद नुकताच लोकप्रिय पाकिस्तानी अभिनेता फहद मुस्तफाच्या रमजान स्पेशल शो जीतो पाकिस्तानमध्ये सहभागी झाली होती.
सध्या सनाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून नेटकरी व्हिडीओवर कमेंट करत प्रतिक्रिया देत आहेत. एक नेटकरी व्हिडीओवर कमेंट करत म्हणाला, ‘ही गरोदर तर नाही…’, दुसरा नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘मला तर वाटतं ही गरोदर असावी…’, तिसरा नेटकरी म्हणाला, ‘शिष्टाचार देखील एक गोष्ट आहे…’ सध्या व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
सना जावेद – शोएब मलिक यांचं लग्न
शोएब याच्या तिसऱ्या लग्नावर फक्त भारत देशाने नाही तर, पाकिस्तानने देखील विरोध दर्शवला. सोशल मीडियावर शोएब – सना यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागला. लग्नानंतर देखील सना हिला अनेक गोष्टींचा सामना करावा लागला. सानिया मिर्झा आणि मुलाची साथ सोडून नवा संसार थाटल्यामुळे शोएब याचा दोन्ही देशांनी विरोध केला.
सानिया मिर्झा – शोएब मलिक
2010 साली पाकिस्तानी खेळाडू शोएब मलिक याच्यासोबत भारताची टेनिसस्टार सानिया मिर्झा हिने लग्न केलं होतं. तेव्हा अनेकांनी दोघांच्या लग्नाचा विरोध केला. कारण सानियासोबत शोएबचं दुसरं लग्न होतं. लग्नानंतर सानिया हिने मुलाला जन्म दिला. पण शोएब याच्या विवाहबाह्य संबंधांना कंटाळून शोएब मलिक याच्यासोबत घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. आता सानिया मुलासोबत आनंदी आयुष्य जगत आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List