कतरिना कैफने मैत्रिणीच्या लग्नात असं काही केलं की, नेटकरी म्हणाले, “ही आहे परफेक्ट सून’
बॉलिवूडमध्ये सध्या चर्चेत असणारी जोडी म्हणजे विकी कौशल आणि कतरिना कैफ. विकी कौशलसोबत लग्न केल्यानंतर कतरिना कैफबद्दल अनेक अफवा उठल्या होत्या पण तिने ज्या पद्धतीने भारतीय संस्कृतीशी जुळवून घेतलं आहे की तिचे व्हिडीओ आणि फोटो पाहून चाहते देखील तिचं कौतुक करतात. दिवाळी असो, करवा चौथ असो किंवा इतर कोणताही सण असो, कतरिना संपूर्ण कुटुंबासह प्रत्येक सणाचा आनंद घेते. असाच एक कतरिना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्या व्हिडीओला पाहून नेटकऱ्यांनीही तिचं कौतुक केलं आहे.
मैत्रिणीच्या हळदी समारंभातला व्हिडीओ व्हायरल
हा व्हिडीओ आहे कतरिना तिच्या मैत्रिणीच्या हळदीला गेली होती त्याचा. कतरिना या व्हिडीओमध्ये तिच्या मैत्रिणीच्या हळदी समारंभात ‘ससुराल गेंदा फूल’ या गाण्यावर नाचताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये तिचा डान्स, लूक आणि स्टाईलने सर्वांचे मन जिंकले आहे. लोक तिच्या भारतीय शैलीचे कौतुक करत आहेत. बरेच लोक तिला ‘परफेक्ट सून’ म्हणत आहेत.
कतरिना पती विक्की कौशल, मेहुणा सनी कौशल आणि शर्वरी वाघसोबत कार्यक्रमात पोहोचली
5 मार्च 2025 रोजी कतरिना तिच्या जिवलग मैत्रिणीच्या हळदी समारंभात पती विकी कौशल, मेहुणा सनी कौशल आणि शर्वरी वाघ आणि कबीर खान सारख्या सेलिब्रिटींसह सहभागी झाली होती. जेव्हा कतरिनाने हा परफॉर्मन्स केला तेव्हा वातावरण आणखी सुंदर झाल्यासारखं वाटतं होतं.
पंजाबी परंपरा ते कौटुंबीक कार्यक्रम
पंजाबी परंपरा साजऱ्या करण्यापासून ते कौटुंबीक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यापर्यंत, कॅट सर्व प्रयत्न करते. कतरिनाचे अनेक असे व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत असतात. विकी कौशलशी लग्न केल्यानंतर कतरिनाने तिच्या सासरच्या लोकांना खूप सुंदरपणे आपलंसं केलं आहे. चाहते असंही म्हणतात की पंजाबी परंपरा साजरी करण्यापासून ते कौटुंबीक कार्यक्रमांमध्ये भाग घेण्यापर्यंत कतरिना सगळं अगदी मनापासून करते.
आताचाच एक किस्सा सांगायचा गेला तर कतरिनाने नुकतंच तिच्या तिच्या सासूबाईंसोबत महाकुंभला हजेरी लावली होती. संगमात पवित्र स्नानही केलं होतं. हे सर्व प्रथा-परंपरा त्यावेळीही तिने तेवढ्याच मनापासून केल्या होत्या.
‘नमस्ते लंडन’ पुन्हा प्रदर्शित
दरम्यान कतरिनाच्या चाहत्यांसाठी अजून एक आनंदाची गोष्ट म्हणजे 14 मार्च रोजी ‘नमस्ते लंडन’ हा क्लासिक चित्रपट पुन्हा एकदा चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.तसेच कतरिनाच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास कतरिना शेवटची विजय सेतुपतीसोबत ‘मेरी क्रिसमस’ मध्ये दिसली होती.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List