मोत्याचा नेकलेस, मखमली साडी; ‘स्टार प्रवाह’च्या पुरस्कार सोहळ्यात माधुरीची शानदार एन्ट्री; साडीची किंमत जाणून धक्का बसेल
बॉलिवूडप्रमाणेच मराठी इंडस्ट्रीतील पुरस्कार सोहळ्याची तेवढीच चर्चा असते. आणि सध्या चर्चा सुरु आहे ती ‘स्टार प्रवाह परिवार’ पुरस्कार 2025 या सोहळ्याची. मालिकेतील कलाकारांना सन्मान व्हावा, त्यांना प्रेक्षकांच्या प्रेमाची पोचपावती मिळावी याकरता प्रत्येक मराठी वाहिनी दरवर्षी पुरस्कार सोहळ्यांचं आयोजन करते. ‘स्टार प्रवाह’ वाहिनीचा पुरस्कार सोहळा येत्या 16 मार्चला संध्याकाळी 7 वाजता संपन्न होणार आहे. पण त्याआधीच या सोहळ्याची चर्चा सुरु आहे.
सोहळ्यातील नामांकनं आणि पुरस्काराची चर्चा
आता या सोहळ्यातील नामांकनं आणि अॅवॉर्डसाठी सगळ्याच मालिकांमध्ये आता स्पर्धा रंगणार आहे. एवढंच नाही तर या सोहळ्यात दरवर्षीप्रमाणे मालिकांमधले लोकप्रिय कलाकार परफॉर्मन्स सुद्धा सादर करणार आहेत. त्यामुळे प्रेक्षक या सोहळ्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान दरवर्षी या सोहळ्यात एक स्पेशल गेस्ट बोलावले जातात. यंदाच्या पुरस्कारसोहळ्यासाठी एक स्पेशल गेस्ट बोलवण्यात आले आहेत. ती म्हणजे सर्वांची आवडती आणि सर्वांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षित.
माधुरी दीक्षित खास गेस्ट म्हणून उपस्थित राहणार
होय, यंदाच्या ‘स्टार प्रवाह’वाहिनीचा पुरस्कार सोहळ्यात माधुरी दीक्षितनेही उपस्थिती लावली आहे. या सोहळ्यातील माधुरीचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. यावर्षी पार पडणाऱ्या ‘स्टार प्रवाह’च्या पुरस्कार सोहळ्यात माधुरी दीक्षित सर्वांचं लक्ष वेधून घेणार आहे असं दिसतं आहे.
माधुरीच्या सुंदर लूकची सर्वांनाच भूरळ
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये माधुरीने सुंदर मरून अशा रंगाची खास मखमली साडी नेसलेली दिसत आहे. त्यावर तिने गळ्यात अगदी साधा-सुदंर असा मोत्याचा नेकलेस घातला होता. आणि अत्यंत कमी दागिने घातले असून मेकअपही हलाकासाच केलेला पाहायला मिळत आहे. पण या मखमली साडीत माधुरी फारच सुंदर आणि आकर्षक दिसत आहे. पुरस्कार सोहळ्याच्या रेड कार्पेटवर माधुरीने एन्ट्री घेताच सर्वांच्या नजरा फक्त तिच्यावरच खिळल्याचं पाहायला मिळालं.
‘धकधक गर्ल’माधुरीच्या मखमली साडीची चर्चा
पण तुम्हाला माहितीये का की या ‘धकधक गर्ल’माधुरीची ही रॉयल साडी श्यामल आणि भूमिका यांनी डिझाइन केली आहे. एका रिपोर्टनुसार या साडीची किंमत तब्बल 1 लाख 80 हजार एवढी आहे. आता सोहळ्यात माधुरीची झलक पाहण्यासाठी तसेत ती सगळ्या कलाकारांना कसं मार्गदर्शन करते हे पाहण्यासाठी सर्वच प्रेक्षक उत्सुक आहेत.
यंदा पुरस्काराच्या शर्यतीत या मालिका
दरम्यान, स्टार प्रवाह’ वाहिनीवर यंदा पुरस्काराच्या शर्यतीत ‘साधी माणसं’, ‘मुरांबा’, ‘शुभविवाह’, ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत!’, ‘उदे गं अंबे’, ‘लग्नानंतर होईलच प्रेम’, ‘घरोघरी मातीच्या चुली’, ‘प्रेमाची गोष्ट’, ‘ठरलं तर मग!’, ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’, ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’, ‘येड लागलं प्रेमाचं’, ‘तू ही रे माझा मितवा’ आणि ‘अबोली’ अशा एकूण 14 मालिका असणार आहेत. आता या मालिकांमध्ये कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List