फरहानची गोव्यात दंबगगिरी, आता ‘वॉन्टेंड गर्ल’ आयशा टाकियाची वादात उडी, थेट असे केले आरोप
Ayesha Takia post: समाजवादी पक्षाचे नेते व आमदार अबू आझमी यांचा मुलगा फरहान आझमी यांची गुंडगिरी समोर आली आहे. त्याने गोव्यात थेट बंदूक काढत धमकावले आहे. या प्रकरणी कारवाई करत गोव्या पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्याला ताब्यात घेतले होते. आता या प्रकरणात बॉलीवूडमधील ‘वॉन्टेंड गर्ल’ आणि फरहानची पत्नी आयशा टाकिया हिने उडी घेतली आहे. या प्रकरणावर तिने इंस्टाग्राम स्टोरी लिहिली असून पतीला सपोर्ट केले आहे.
आयशा टाकिया हिचा पती फरहान आझमीवर गोव्यामध्ये गोंधळ घातल्याचा आरोप आहे. तसेच बंदूक काढून धमकवल्याचेही म्हटले आहे. त्यावरुन गोव्या पोलिसांनी त्याच्यावर कलम १९४ नुसार गुन्हा दाखल करत त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्या प्रकरणावर आयशा टाकिया हिने सोशल मीडितातून उत्तर दिले आहे.
आयशाने म्हटले की, फरहान आणि त्याच्या मुलास गोव्यातील काही स्थानिक लोकांनी खूप त्रास दिला. आम्ही महाराष्ट्रातील असल्याबद्दल आणि मोठी गाडी वापर असल्याबद्दल शिविगाळ केली. यामुळे फरहान याने पोलिसांना मदतीसाठी बोलवले होते. परंतु पोलिसांनी मदत करण्याऐवजी आमच्यावरच गुन्हा दाखल केला.

आयशा टकियाची पोस्ट
आयशा टाकियाने काय लिहिले…
आयशा टाकियाने इंस्टाग्राम स्टोरीजमध्ये पोस्ट लिहीत म्हटले की, आमच्या कुटुंबासाठी ती एक भयानक रात्र होती. मी नुकतीच एक पोस्ट पाहिली. त्यामुळे मला वाटले की हे आपल्या सर्वांसोबत शेअर करणे गरजेचे आहे. माझ्या पती आणि मुलाला गोव्यात धमक्या देण्यात आल्या. त्याच्या जीवालाही धोका होता. स्थानिक गुंडांनी कुटुंबाला घेरले आणि तासनतास त्रास दिला. सुमारे 150 लोकांच्या गर्दीच्या भीतीने फरहान याने 100 नंबर डायल केला होता. यामुळे माझ्या पतीनेच पोलिसांना कळवले होते आणि सुरक्षेसाठी बोलावले होते.
आयशा पुढे म्हणते, गोव्यात महाराष्ट्राविषयी द्वेष वाढला आहे. कारण फरहान आणि माझ्या मुलाला त्या लोकांनी आम्ही महाराष्ट्राचे असल्याबद्दल वारंवार शिव्या दिल्या. पुढच्या पोस्टमध्ये, आयशाने दावा केला आहे की, तिच्याकडे सत्य सिद्ध करण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज आणि अनेक क्लिप आहेत. त्याचा वापर फक्त कायदेशीर प्रक्रियेसाठी करणार आहे. आम्हाला न्याय मिळेल, असा विश्वास आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List