पंतप्रधान मोदींच्या हस्ते ‘वनतारा’ वन्यजीव प्रकल्पाचे उद्घाटन, अनंत अंबानींच्या कामाचे केले कौतुक
जागतिक वन्यप्राणी दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गीरच्या अभयारण्याला भेट दिली.
तर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या जामनगरमधील ‘वनतारा’ या वन्यजीव संवर्धन आणि पुनर्वसन प्रकल्पाचे उद्घाटन केले आहे.
यावेळी या प्रकल्पावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनंत अंबानी आणि त्यांच्या टीमचे कौतुक केले.
‘वनतारा’ या वन्यजीव संवर्धन आणि पुनर्वसन प्रकल्पाची माहिती घेत काही वन्यजीवांची सफरही केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या भेटीचे फोटो आपल्या ट्विटर हँडलवरून शेअर केले आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List