विकी कौशलच्या ‘छावा’ला मोठा फटका! अडीच तासांचा सिनेमा… नेमकं काय झालं?
छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्यगाथेवर आधारित ‘छावा’ हा सिनेमा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. १४ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. अवघ्या तीन दिवसात या चित्रपटाने १२१ कोटी रूपयांचा पल्ला पार केला आहे. या चित्रपटात अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. आता या चित्रपटाला मोठा फटका बसल्याचे दिसत आहे. नेमका कसला फटका बसला चला जाणून घेऊया…
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेता विकी कौशलच्या ‘छावा’ सिनेमाला फायरसीचा फटका बसला आहे. २ तास ३५ मिनिटांचा हा सिनेमा बेकायदेशीर प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करण्यात आला आहे. त्यामुळे लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ सिनेमाला बॉक्स ऑफिसावर पायरसीमुळे फटका बसणार असल्याचे बोलले जात आहे.
चित्रपटाच्या कमाईविषयी
‘छावा’ चित्रपटाने अवघ्या तीन दिवसांमध्ये बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. हा चित्रपट २०२५ या वर्षांतील सर्वाधिक ओपनिंग करणारा सिनेमा ठरला आहे. पहिल्या दिवशी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ३३.१० कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर दुसऱ्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत वाढ झाली असून ती ३९.३० कोटी रूपयांवर पोहोचली. त्यानंतर रविवारी म्हणजेच १६ फेब्रुवारी रोजी या चित्रपटाच्या कमाईत बक्कळ वाढ झाली. चित्रपटाने ४९.०३ कोटी रूपयांचा गल्ला जमावला. पहिल्या तीन दिवसात सिनेमाने जवळपास १२१.४३ कोटी रूपयांची कमाई केली. पण आता पायरसीमुळे प्रेक्षक चित्रपटाकडे पाठ फिरवणार का? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
छावा सिनेमाविषयी
‘छावा’ सिनेमाविषयी बोलायचे झाले तर या चित्रपटाची निर्मिती दिनेश विजन यांनी केली आहे. या चित्रपटात विकी आणि मंदानासोबतच अक्षय खन्ना, आशुतोष राणा, दिव्या दत्ता, डायना पेंटी, विनीत कुमार सिंग हे बॉलिवूडमधील कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. तसेच या चित्रपटात मराठी कलाकारांची देखील फौज पाहायला मिळत आहे. चित्रपटात संतोष जुवेकर, शुभंकर एकबोटे, आशिष पाथोडे, सारंग साठ्ये, सुव्रत जोशी आणि नीलकांती पाटेकर हे कलाकार दिसत आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List