मुख्यमंत्र्यांनी संतोष देशमुख हत्येप्रकरणी माहिती लपवली, राज्य सरकारलाही सहआरोपी करा – नाना पटोले
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी संतोष देशमुख हत्येप्रकरणी माहिती लपवली, राज्य सरकारलाही सहआरोपी करा, अशी मागणी काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केली आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येचे धक्कादायक फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत. हे फोटो आणि व्हिडीओ समोर आल्यानंतर राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे. यातच राज्य सरकारवर टीका करत नाना पटोले यांनी X वर एक पोस्ट करत ही मागणी केली आहे.
X वर केलेल्या पोस्टमध्ये नाना पटोले म्हणाले आहेत की, “मुख्यमंत्र्यांनी प्रोटोकॉल सोडून अजित पवार यांच्या शासकीय बंगल्यावर जाऊन रात्री चर्चा केली. त्यातून धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला. सरकारला या प्रकरणाची सर्व माहिती होती, पण त्यांनी ती लपवली. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनातही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खोटी माहिती देऊन सभागृह व जनतेची दिशाभूल केली. सरपंच हत्येमध्ये वाल्मीक कराड व त्याचे सहकारी आरोपी आहेत, पण सरकारने या प्रकरणातील माहिती लपवल्याने त्यांनाही सहआरोपी केले पाहिजे.”
मुख्यमंत्र्यांनी प्रोटोकॉल सोडून अजित पवार यांच्या शासकीय बंगल्यावर जाऊन रात्री चर्चा केली व त्यातून धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला. सरकारला या प्रकरणाची सर्व माहिती होती पण त्यांनी ती लपवली. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनातही मुख्यमंत्री फडणवीस यांनी खोटी माहिती देऊन सभागृह व जनतेची… pic.twitter.com/VHr9NWTMkz
— Nana Patole (@NANA_PATOLE) March 4, 2025
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List