छत्रपती संभाजी महाराजांबद्दल केआरकेच्या वादग्रस्त ट्विटप्रकरणी फडणवीसांची आक्रमक भूमिका
स्वयंघोषित चित्रपट समीक्षक कमाल आर. खान ऊर्फ केआरके याने छत्रपती संभीज महाराजांबद्दल एक्स (ट्विटर) अकाऊंटवर आक्षेपार्ह पोस्ट लिहिली आहे. छत्रपती संभाजी महाराजांबद्दल ट्विट करताना केआरकेनं सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. केआरकेनं विकिपीडियाचा आधार घेत पोस्ट लिहिली होती. विकिपीडियाशी संपर्क साधून वादग्रस्त मजकूर काढण्याचे आदेश फडणवीसांनी दिले आहेत. सायबर विभागाचे आयजी यशस्वी यादव यांना फडणवीसांनी हे आदेश दिले आहेत.
“विकिपीडियावर छत्रपती संभाजी महाराजांबद्दल जो वादग्रस्त मजकूर लिहिण्यात आला आहे, त्याप्रकरणी सायबर विभागाचे आयजी यशस्वी यादव यांच्याशी संपर्क साधला आहे. विकिपीडिया आणि त्याच्याशी संबंधित यंत्रणेशी संपर्क साधून तो मजकूर काढून टाकण्याचे आदेश त्यांना दिले आहेत. त्यासाठी जी प्रक्रिया करावी लागेल, ती तातडीने करावी, असं त्यांना सांगण्यात आलं आहे. अशा पद्धतीचा आक्षेपार्ह मजकूर ओपन सोर्सवर राहणं अत्यंत चुकीचं आहे. त्यामुळे ते तिथून काढून टाकण्यासाठीचे आदेश संबंधितांना देण्यात आले आहेत. छत्रपती संभाजी महाराज हे आमचे आदर्श आहेत, त्यांच्यासंदर्भात असले लेखन खपवून घेणार नाही”, अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली.
This is the real History! It was never Hindu Muslim! Sambhaji’s behaviour, including alleged irresponsibility and addiction to sensual pleasures, led Shivaji to imprison his son at Panhala fort in 1678 to curb his behaviour.[5][6] While another theory suggests that Sambhaji was…
— KRK (@kamaalrkhan) February 17, 2025
“विकिपीडियावरील मजकूर ठराविक लोकांना एडिट करता येतो. आम्हाला कल्पना आहे की ते भारतातून संचालित होत नाही. त्यांचे काही नियम आहेत. ज्यांच्याकडे त्याचे एडिटोरीयल राईट्स असतात, त्यांच्यासाठी ऐतिहासिक गोष्टींबद्दल लिहिण्यासाठी काही नियमावली आखली जाऊ शकते का, याबद्दल आम्ही चर्चा करणार आहोत. ओपन सोर्सवर अशा पद्धतीने ऐतिहासिक गोष्टी तोडून-मोडून लिहिणाऱ्यांविरोधात नियमावली तयार करा अशा सूचना आपण देऊ. भौगोलिक रचनेमुळे नियमावली आणखं सोपं होतं. पण सोशल मीडियाची भौगोलिक चौकट नसल्याने नियम आणखं कठीण आहे. अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य असीमित नाही. दुसऱ्यांच्या स्वातंत्र्यावर घाला घालू शकत नाही,” असंदेखील फडणवीस म्हणाले.
ज्याठिकाणी अश्लीलता परिसीमेच्या बाहेर जाते, त्याठिकाणी कारवाई करणं गरजेचं असतं. यासंदर्भात काही नियमावली करता येईल का, याबाबत आमची केंद्र सरकारशी चर्चा सुरू आहे, असंही फडणवीसांनी स्पष्ट केलं.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List