Latur News – भरधाव दुचाकीची उभ्या टेम्पोला धडक, 26 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

Latur News – भरधाव दुचाकीची उभ्या टेम्पोला धडक, 26 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

अहमदापूर शहरापासून जवळच असलेल्या राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या भक्ती स्थळाजवळील कासनाळे पेट्रोल पंपासमोर राष्ट्रीय महामार्ग क्र.361 वर एका दुचाकीने मालवाहू टेम्पोला पाठीमागून जोराची धडक दिली. यात दुचाकीवरील एका 26 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून, एक जण गंभीर जखमी झाला असल्याची दुर्दैवी घटना सोमवारी (3 मार्च 2025) संध्याकाळी घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रवी परशुराम राठोड (वय 26 वर्ष) हा तरुण आपल्या मित्रासोबत काही कामानिमित्त अहमदपूर येथे आला होता. तो आपले काम आटपून अहमदपूर कडून गावाकडे लिंबोटी येथे दुचाकी वरून आपल्या मित्रासोबत जात होता. याच दरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्र.361 वरील राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्च महाराज भक्ती स्थळाजवळील कासनाळे पेट्रोल पंपासमोर डिझेल संपल्यामुळे रस्त्याच्या बाजूला टेम्पो थांबला होता. दुचाकीवरील चालकाला अंदाज न आल्यामुळे भरधाव वेगात दुचाकी टेम्पोला धडकली. या अपघातात दुचाकवरील रवी राठोड (26) याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर पाठीमागे बसलेला त्याचा मित्र गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारांसाठी लातूर येथे पाठवण्यात आले आहे. सदरील अपघाताच्या घटनेची अहमदपूर पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

सर्बियाच्या संसदेत फेकले ग्रेनेड; खासदार गंभीर सर्बियाच्या संसदेत फेकले ग्रेनेड; खासदार गंभीर
सर्बियाच्या संसदेत विरोधी पक्षाच्या खासदारांनी गोंधळ घातला. तसेच एकापाठोपाठ स्मोक ग्रेनेड आणि अश्रुधुरांचे गोळे फेकले. यामुळे अधिवेशनात एकच गोंधळ उडाला....
शीव पुलाचे काम पुन्हा रखडले; रेल्वेचा जागेसाठी संघर्ष
सैफ अली हल्ला प्रकरण; महिन्याअखेर होणार आरोपपत्र न्यायालयात दाखल 
Latur News – भरधाव दुचाकीची उभ्या टेम्पोला धडक, 26 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू
धनंजय मुंडे यांचा राजीनामा होताच देवगिरी बंगल्यावर बैठक, अजितदादा गटाचे बडे नेते पोहोचले; मोठ्या घडामोडींना वेग
फरहानची गोव्यात दंबगगिरी, आता ‘वॉन्टेंड गर्ल’ आयशा टाकियाची वादात उडी, थेट असे केले आरोप
पाकिस्तानी लष्करी कम्पाउंडमध्ये आत्मघातकी हल्ला; स्फोटकांच्या गाड्यांचा घडवला अपघात, 6 जणांचा मृत्यू