काँग्रेसच्या आंदोलनादरम्यान कार्यकत्यांनीच नेत्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
आज यवतमाळ जिल्ह्याच्या काँग्रेस कमिटीच्यावतीने शेतकरी न्याय हक्कासाठी धरणे आंदोलन करण्यात केलं. या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी नेत्यांवर रोष व्यक्त करत त्यांना भर आंदोलनात खडेबोल सुनावले आहेत. निवडणुकीत सातत्याने होणाऱ्या पराभवानंतरही काँग्रेस नेते जमिनीवर आले नसून शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे अजूनही दुर्लक्षित करत असल्याचं म्हणत कार्यकर्त्यांनी नेत्यांना कानपिचक्या दिल्या आहेत.
दरम्यान, महायुती सरकारने निवडणुकीत शेतकऱ्यांना सोयाबीन केंद्र सुरू करणार, कर्जमाफी, शेतमालाला भाव देणार, कापूस खरेदी, पीकविमा, शेकऱ्या मोफत वीज देणार असल्याची विविध आश्वासन दिली होती. मात्र सत्तेत आल्यानंतर महायुतीला या आश्वासनांचा विसर पडला आहे. याचीच आठवण करून देत शेतकऱ्यांना दिलेले आश्वासन पूर्ण करावे, या मागणीसाठी काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात माजी प्रदेशाध्यक्ष माणिकाराव ठाकरे, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, असं काँग्रेसचे बडे नेते उपस्थित होते. यावेळी आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांना बोलण्याची संधी मिळाली असता त्यांनी नेत्यांना खडेबोल सुनावले आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List