मध्यान्ह भोजनातून ‘चिक्की’ बाद, अंडी आणि केळी देण्याचा कर्नाटक सरकारचा निर्णय
शालेय मुलांची पोषण स्थिती चांगली राहण्यासाठी मध्यान्ह भोजन ही योजना सुरू करण्यात आली. मात्र या योजने अंतर्गत लहान मुलांना देण्यात येणाऱ्या चिक्कीमध्ये हानिकारक पदार्थ आढळले आहेत. यामुळे कर्नाटक सरकारने राज्यातील शाळांमधून शेंगदाणा, गूळ आणि साखरेपासून बनवण्यात आलेल्या चिक्कीचे वाटप थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. चिक्कीच्या बदल्यात अंडी आणि केळी देण्याचे निर्देश शालेय
चिक्कीमध्ये असंतृप्त चरबी (unsaturated fats) आणि उच्च सारखेचे प्रमाण जास्त प्रमाणात आढळले आहे. यामुळे मुलांच्या आरोग्यावर वाईट परिणाण होऊ शकतो. त्यामुळे शालेय शिक्षण विभागाने शाळांमधून मुलांना देण्यात येणाऱ्या चिक्कीचे वाटप बंद करून त्या बदल्यात अंडी आणि केळी देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती शालेय विभागाने दिली आहे. एवढेच नाही तर शालेय मुलांना देण्यात येणाऱ्या चिक्कीची अयोग्य पद्धतीने साठवणूक करून एक्सप्रायरी झालेल्या चिक्कीचेही वितरण केले जात असल्याचे समोर आले आहे. यावर शिक्षण विभागाने चिंता व्यक्त केली आहे.
कर्नाटक सरकारने 2021 मध्ये मध्यान्ह भोजनात अंड्याऐवजी केळी आणि चिक्की देण्याचा निर्णय घेतला होता. अंडी न खाणाऱ्या मुलांना केळीऐवजी शेंगदाणा-गुळाची चिक्की देण्यात येत होती. मात्र आता चिक्कीचे वाटप बंद करण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील जवळपास 8 लाख मुलांना केळी किंवा अंडी यापैकी एकाची निवड मध्यान्ह भोजनात करावी लागणार आहे.
दरम्यान, ‘इंडियन एक्सप्रेस’ने डिसेंबर 2022 मध्ये दिलेल्या एका आकडेवारीनुसार कर्नाटकातील फक्त 2.27 लाख मुलांनी चिक्कीला प्राधान्य दिले होते, तर इतर 80 टक्के विद्यार्थ्यांनी मध्यान्ह भोजनासाठी अंड्याची निवड केली होती. सरकारी शाळेतील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांकडून हा डेटा गोळा करण्यात आला होता.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List