‘बिग बॉस मराठी’ फेम डीपीची महाराष्ट्र केसरी स्पर्धेवरून पोस्ट, कोणाची घेतली बाजू ?

‘बिग बॉस मराठी’ फेम डीपीची  महाराष्ट्र केसरी स्पर्धेवरून पोस्ट, कोणाची घेतली बाजू ?

‘बिग बॉस मराठी 5’ हा सीझन संपून अनेक महिने उलटून गेले तरीही त्यातील अनेक स्पर्धक चर्चेत असतात. सूरज चव्हाण विजेता ठरला असला तरी इतर स्पर्धकांचीही बरीच चर्चा होत असते. त्यापैकीच एक म्हणजे कोल्हापूरचा रांगडा गडी डीपी उर्फ धनंजय पोवार. सोशल मीडिया इन्फ्लुएंसर धनंजय पोवार देखील ‘बिग बॉस मराठी’च्या या सिझनमध्ये होता. त्याचा गेम आणि ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील वावर प्रेक्षकांना आवडला आता बिग बॉस संपलं असलं तरी तो सोशल मीडियावर बराच ॲक्टिव्ह असतो. तो अनेक पोस्ट करत असतो. त्याच धनंजय पोवारने एक नवी पोस्ट केली असून त्यामुळे तो पुन्हा चर्चेत आला आहे.

खरंतर डीपी उर्फ धनंजय पोवारने महाराष्ट्र केसरी स्पर्धेविषयी एक पोस्ट केली आहे. महाराष्ट्र केसरी स्पर्धेत शिवराज राक्षे याचा पराभव झाल्यानंतर त्यांनी पंचाच्या निकालाविरोधात नाराज व्यक्त करीत त्यांना लाथ मारल्याचा प्रकार घडल्याने गोंधळ उडाला होता. शिवराज राक्षेने पंचांना लाथ मारली आणि त्यांची कॉलर देखील पकडल्याने पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. याच मुद्यावरून आता डीपीने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाला धनंजय पोवार ?

धनंजय पोवार उर्फ डीपीने स्टोरी शेअर करत काही ओळी लिहील्या आहेत – ” कोणत्याही गोष्टीच समर्थन नाही करत. पण निर्णय चुकला आहे असे राक्षे यांचे मत आहे. त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारे जे हावभाव होते, ते एक खेळाडूलाच समजतील.” “इतकी वर्षे मेहनत करुन असा पराभव कोणत्या खेळाडूला आवडेल?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच न्याय झाला की अन्याय ? असा सवालही त्यांनी पोस्टच्या खाली चाहत्यांना विचारला आहे. त्याच्या या पोस्टची बरीच चर्चा सुरू आहे.

नेमकं काय घडलं होतं ?

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या उपांत्य सामन्यावेळी अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला. या सामान्यात पंचाने शिवराज राक्षेला बाद केलं. त्यामुळे शिवराजने चिडून पंचाला लाथ मारली आणि शिवीगाळ केली होती. त्यानंतर मैदानात एकच गोंधळ उडाला. धक्काबुक्कीही झाली, अर्धा तास हा गोंधळ सुरू होता. त्यानंतर महेंद्र गायकवाड आणि पृथ्वीराज मोहोळ यांच्यात अंतिम सामना सुरू झाला. यावेळी हाफ टाइममध्ये महेंद्रने पंचाशी वाद घालयाला सुरुवात केली. त्याने पंचाला शिवागीळ केली आणि हुज्जत घालत थेट मैदानच सोडलं. त्यामुळे पृथ्वीराजला विजयी घोषित करण्यात आलं. मात्र, या दोन्ही पैलवानांच्या गैरवर्तनाची दखल घेऊन कुस्तीगीर परिषदेने शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड या दोघांनाही तीन वर्षासाठी निलंबित केलं.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

टीम इंडियाने बांगलादेशला लोळवलं, 6 गडी राखून केला पराभव; शुभमन गिलने झळकावलं शतक टीम इंडियाने बांगलादेशला लोळवलं, 6 गडी राखून केला पराभव; शुभमन गिलने झळकावलं शतक
टीम इंडियानं आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ची सुरुवात विजयानं केली आहे. दुबईमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात बांगलादेशचा 6 गडी राखून...
लाडक्या बहि‍णींना भेटून आदिती तटकरे यांची महत्वाची घोषणा, काय म्हणाल्या ?
चार वर्षांच्या ब्रेकनंतर प्रसिद्ध अभिनेत्रीचं टीव्हीवर कमबॅक; आता मध्येच सोडला शो
Apple चा सर्वात स्वस्त iPhone लॉन्च, मिळणार जबरदस्त कॅमेरा आणि फीचर्स; जाणून घ्या किंमत
मुंबईतल्या गोरेगावमध्ये भीषण आग, अग्निशमन दलाच्या 14 गाड्या घटनास्थळी दाखल
जालन्यातील खरपुडी प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री सचिवालयाकडून चौकशीचे आदेश, अंबादास दानवेंनी उठवला होता आवाज
100 व्या नाट्य संमेलनानिमित्त विशेष नाट्य महोत्सवाची दमदार सुरुवात, सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते झालं उद्घाटन