आमिर खान वयाच्या 59 व्या वर्षी कोणाच्या प्रेमात, तिचं नाव काय? बॉलिवूडशी खास कनेक्शन
Aamir Khan: अभिनेता आमिर खान गेल्या काही दिवसांपासून त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. आमिर खान याचं प्रोफेशनल आयुष्य उत्तम असलं तरी, अभिनेता खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असतो. रीना दत्तासोबत पहिलं लग्न आणि दोन मुलं असताना देखील आमिर यांने दिग्दर्शिका किरण राव हिच्यासोबत लग्न केलं. किरण राव आणि आमिर यांना देखील एक मुलगा आहे. पण आमिर खान याचं दुसरं लग्न देखील फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी सहमतीने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला.
दोन घटस्फोट झाल्यानंतर वयाच्या 59 व्या वर्षी अभिनेता पुन्हा प्रेमात पडल्याची चर्चा रंगली आहे. तिसऱ्यांदा आमिर खानच्या आयुष्यात खास व्यक्तीची एन्ट्री झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आमिर खान बेंगळुरू येथील एका महिलेला डेट करत आहे. आमिरने तिची ओळख कुटुंबियांसोबत देखील करुन दिली आहे.
काय आहे तिचं नाव?
आमिर खान याच्या आयुष्यात आलेल्या तिसऱ्या महिलेचं नाव गौरी असल्याची माहिती समोर येत आहे. सध्या सोशल मीडियावर आणि चाहत्यांमध्ये आमिर खान याच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे. पण यावर आमिर खान याने अद्याप अधिकृत वक्तव्य केलं नाही.
आमिर खान आणि रीना दत्ता यांचं लग्न
1986 मध्ये आमिर खान आणि रीना दत्ता यांनी लग्न केलं. दोघांना दोन मुलं आहे. त्यांच्या मुलाचं नाव जुनैद खान तर, मुलीचं नाव आयरा खान असं आहे. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. 2002 मध्ये दोघांनी घटस्फोटासाठी अर्ज केला आणि वेगळे झाले.
किरण राव यांचं लग्न आणि घटस्फोट
पहिल्याच्या घटस्फोटाच्या तीन वर्षांनंतर 2005 मध्ये दिग्दर्शिका किरण राव यांनी लग्न केलं. 2011 मध्ये किरण – आमिर यांनी मुलगा आझाद यांचं स्वागत केलं. पण दोघांचं नातं देखील फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी 2021 मध्ये घटस्फोटाची अधिकृत घोषणा केली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List