माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद, आमदारकी धोक्यात! न्यायालयाने 2 वर्षांची शिक्षा सुनावल्याने वाढल्या अडचणी
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अडणची वाढल्या आहेत. नाशिक जिल्हा न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांना 2 वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. तसेच 50 हजारांचा दंडही सुनावला आहे. यामुळे कोकाटे यांचे मंत्रीपद आणि आमदारकीही धोक्यात आली आहे. लोकप्रतिनिधीला दोन किंवा त्यापेक्षा जास्त वर्षांची शिक्षा झाल्यास त्याचे सभागृहाचे सदस्यत्त्व रद्द होते. त्यामुळे आता माणिकराव कोकाटे यांना मंत्रिपद आणि आमदारकी गमवावी लागू शकते.
काय आहे प्रकरण?
माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ सुनील कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने 2 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. माणिकराव कोकाटे यांना 2 वर्षांचा कारावास आणि 50 हजारांच्या दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. 1995 मध्ये कागदपत्रांच्या फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप माणिकराव कोकाटे यांच्यावर केला होता. माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी या प्रकरणी याचिका दाखल केली होती.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List