बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, कार आग लागून दोघांचा मृत्यू; एक गंभीर जखमी
बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर कारला भीषण आग लागून दोघांचा होरपळून मृत्यू झाला तर कार चालक गंभीर जखमी झाला. अभिजीत चव्हाण असे जखमी चालकाचे नाव आहे. जखमी चालकाला उपचारासाठी सिंदखेड राजा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताचे कारण अद्याप समजू शकले नाही. पोलीस तपास करत आहेत.
मुंबईहून अकोल्याला जाणाऱ्या कारला समृद्धी महामार्गावरील नागपूर कॉरिडॉरवर चेनेज 318.8 जवळ अचानक आग लागली. आग लागल्यानंतर कारचा स्फोट झाला. यानंतर कार साईड बॅरिकेटला धडकली. या आगीत कारमधील दोघांचा जळून मृत्यू झाला. तर कार चालक गंभीर जखमी झाला. गणेशे टेकाडे आणि राजू जायसवाल अशी मयतांची नावे आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List