कथा, कादंबरी आणि बाॅलीवूड!
On
‘छावा’ चित्रपटाची बाॅक्स ऑफिसवर तुफान बॅटिंग सुरु असताना, शिवाजी सावंत यांच्या छावा कादंबरीला पुन्हा एकदा मागणी वाढू लागली आहे. बॉलिवूडमध्ये एखाद्या कांदबरी किंवा पुस्तकावर आधारीत सिनेमा येण्याची ही काही पहिली वेळ नाही. तर या आधी सुद्धा बॉलिवूडमध्ये पुस्तक आणि कादंबरीवर आधारीत सिनेमे आले आहेत. त्याच सिनेमांची यादी आपण बघूया.
देवदास1955 साली प्रदर्शित झालेला एक आयकाॅनिक चित्रपट म्हणून देवदासची ओळख आहे. अभिनेता दिलीप कुमार, सुचित्रा सेन आणि वैजयंतीमाला या कलाकारांच्या यामध्ये प्रमुख भूमिका होत्या. ‘देवदास’ हा चित्रपट सरत चंद्र उपाध्याय यांच्या ‘देवदास’ या कादंबरीवर आधारीत होता. या चित्रपटानंतर दिलीप कुमार यांची ओळख ट्रॅजडी किंग अशी झाली होती.बालिका वधू1976 साली प्रदशिंत झालेला बालिका वधू या चित्रपटाचे बडे अच्छे लगते हैं हे गाणे तब्बल ५० वर्षांनीही प्रेक्षकांच्या ओठी गुणगुणले जाते. या चित्रपटातील गाणी आणि सचिन आणि रजनी शर्मा यांच्या उत्कृष्ट अभिनयासाठी पुन्हा पुन्हा पाहिला जातो. या चित्रपटाची कथा ही बिमल कर यांच्या बालिका वधू या कादंबरीवर आधारली होती.
शालिमार1978 साली प्रदर्शित झालेला शालिमार चित्रपटामध्ये धर्मेंद्र, झीनत अमान यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या चित्रपटाची कथा ही ‘The vulture is a patient bird’ या जेम्स हेडली जेस यांच्या कादंबरीवर आधारित होती.
अखियों के झरोखों से..1978 साली हा चित्रपट सचिन, रंजिता यांच्या प्रमुख भुमिका असलेला अखिंयो के झरोकें से चित्रपट गाण्यामुळे खूप गाजला. लव स्टोरी या एरिक सैगल यांच्या पुस्तकावर आधारीत हा सिनेमा तयार करण्यात आला होता.
उमराव जान1981 मध्ये रेखाच्या अदाकारीने असंख्य प्रेक्षकांना घायाळ केले तो चित्रपट म्हणजे उमराव जान. या चित्रपटाचा रिमेकही करण्यात आला पण तो सपशेल फेल गेला. रेखा, फारुक शेख आणि नसरुद्दीन शहा अशी तगडी स्टारकास्ट या चित्रपटाची होती. या चित्रपटाची कथा ही ख्यातनाम लेखक मिर्जा मुहम्मद हादी रुसवा यांच्या ‘अदा’ या कादंबरीवर आधारीत होती.
कयामत से कयामत तक1988 च्या काळात या चित्रपटाने तरुणांना अक्षरशः वेड लावले होते. या चित्रपटामध्ये आमीर खान आणि जुही चावला यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या. चित्रपटातील गाणी आजही प्रेक्षकांच्या ओठी तोंडपाठ आहेत. हा चित्रपट ख्यातनाम लेखक विल्यम शेक्सपिअर यांच्या रोमिओ अँड ज्युलिएट या कादंबरीवर आधारित होता.
सावरिया2007 साली सावरिया हा चित्रपट सोनम कपूर आणि रणबीर कपूर यांच्यासाठी पहिला चित्रपट म्हणून बाॅक्स आॅफीसवर फार कमाल करु शकला नाही. परंतु या दोघांचेही पदार्पण याच सिनेमातून झाल्यामुळे सिनेमाचे नाव लक्षात आहे. हा सिनेमा फ्योदोर दोस्तोव्योस्की या रशियन लेखकाच्या ९० पानांच्या व्हाईट नाईटस् या लघुकथेवर आधारीत होता.
सात खून माफप्रियांका चोप्राने या चित्रपटात महत्त्वाची भूमिका वठवली होती. २०११ साली हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. ख्यातनाम लेखक रस्किन बाॅंड यांच्या Sussans seven husband या इंग्रजी कादंबरीवर आधारीत हा चित्रपट साकारला होता.बाजीराव मस्तानी2015 साली प्रदर्शित झालेला बाजीराव मस्तानी या चित्रपटामध्ये रणीवीर सिंग, प्रियांका चोप्रा आणि दीपिका पादुकोण यांच्या प्रमुख भूमिका होत्या. मराठीतील गाजलेली कादंबरी राऊ वर आधारीत हा चित्रपट बेतला होता. या कादंबरीचे लेखक नागनाथ स ईनामदार आहेत.
पदमावत2018 साली प्रदर्शित झालेला पद्मावत हा चित्रपट प्रदर्शनाआधीच नावावरून वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. या चित्रपटामध्ये रणवीर सिंग, दीपिका पादुकोण आणि शाहीद कपूर यांनी महत्त्वाची भूमिका केली होती. हा चित्रपट मलिक मोहम्मद जयासी यांच्या गाजलेल्या कवितेवर आधारीत होता.
Tags:
About The Author
![Manisha Thorat- Pisal Picture](https://www.newsexpressmarathi.com/media/100/2023-08/manisha.jpg)
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
21 Feb 2025 20:05:02
SSC Paper Leak 2025: दहावीच्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी मराठी विषयाचा पेपर राज्यातील काही शहरांमध्ये फुटला. या पेपर फुटी प्रकरणाची गंभीर...
Comment List