Priyanka Chopra : सून असावी तर अशी ! प्रियांका चोप्राने सासूबाईंसाठी केलं असं काही, चाहत्यांचं मन जिंकलं

Priyanka Chopra : सून असावी तर अशी ! प्रियांका चोप्राने सासूबाईंसाठी केलं असं काही, चाहत्यांचं मन जिंकलं

अभिनेत्री प्रियांका चोप्राचं नाव फक्त बॉलिवूडपुरतं मर्यादित नसून हॉलिवूडमध्येही तिने तिची ओळख बनवली आहे. त्यामुळे फक्त भारतातच नव्हे तर जगभरात तिचे कोट्यवधी फॉलोअर्स, चाहते आहेत. सध्या जरी ती बॉलिवूडमध्ये कार्यरत नसली तरी नुकतची पीसी ही भारतात आली आहे. प्रियांकाचा भाऊ सिद्धार्थ याचा काही महिन्यांपू्र्वीच साखरपुडा झाला होता आणि आता तो विवाहबद्ध होत आहे. त्याच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरूवात झाली असून खास त्यासाठी प्रियांका भारतात आली आहे. प्रियांकाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. प्रियांका ही हॉलिवूडमधे कार्यरत असी आणि सध्या अमेरिकेत रहात असील तरी ती तिच्या संस्कृतीशी अजूनही संलग्न आहे.

ती नुकतीचसिद्धार्थ चोप्राच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनमध्ये जबरदस्त स्ट्रॅपलेस गाऊन घालून पोहोचली होती. यावेळी देसी गर्लचे सासू-सासरेही तिच्यासोबत दिसले. पापाराझींसमोर पोझ देतानाही प्रियांकाला सासरच्या लोकांचा विसर पडला नव्हता.त्यांनाही सोबत बोलावून तिने फोटोसाठी पोझ दिली. मात्र त्याचवेळी प्रियांकाने तिच्या सासूबाईंसाठी असं काही केलं की ते पाहून चाहते खुश झाले. तिचा हा व्हिडीओ सध्या बराच व्हायरल झाला असून चाहत्यांनी तिच्यावर कमेंट्सचा वर्षाव करत तिचं कौतुक केलंय.

सध्या प्रियांका चोप्राचा तो व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. प्रियांका जेव्हा संगीत फंक्शनसाठी पोहोचली तेव्हा तिने पापाराझींना जबरदस्त पोज दिली. यावेळी त्याच्यासोबत निक जोनासचे आई-वडीलही उपस्थित होते. या लग्नाला निक जोनास आलेला दिसला नाही, अद्याप त्याचं दर्शन झालेलं नाहीये. पण लग्नाला हजेरी लावण्यासाठी प्रियांकाचे सासरे आणि सासरे पोहोचले आहेत. प्रियांकाची सासू, डेनिस जोनास या गुलाबी रंगाच्या साडीत दिसल्या तर केविन जोनास सिनियर यांनीही भारतीय पोशाख घातला होता.

सासूबाईंसाठी प्रियांकाची खास कृती

सासू-सासऱ्यांसोबत प्रियांकाने पापाराझींसाठी पोज दिली मात्र त्यापूर्वी ती तिच्या सासूची साडीही फिक्स करताना दिसली. अभिनेत्रीची ही कृत, तिची काळजी घेण्याची पद्धत चाहत्यांना खूप आवडली. ती तिच्या सासरच्या लोकांशी किती चांगली वागते, असे म्हणत अनेकांनी तिची स्तुति केली. प्रियांकाच्या आउटफिटबद्दल सांगायचं झालं तर तिने या फंक्शनसाठी पांढऱ्या रंगाचा स्ट्रॅपलेस गाऊन घातला होता. तिच्या गाऊनवर फुलांचे आणि पानांचे रंगीत डिझाइन होतं.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Manav Manglani (@manav.manglani)

याशिवाय तिने गळ्यात एक सुंदर नेकपीसही घातला होता. खुले केस, हातात एक ब्रेसलेट आणि दोन अंगठ्या घालून पीसीने तिचा लूक पूर्ण केला. प्रियांकाचा हा लूक तिच्या भावाच्या संगीत फंक्शनसाठी परफेक्ट होता. प्रियांका तिच्या भावाच्या प्री-वेडिंग फंक्शनचा खूप आनंद घेत आहे. तिने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर या फंक्शनचे बरेच फोटो आणि व्हिडिओ शेअर केलेत. प्रियांका तिच्या प्रत्येक लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेते.

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

उणे 6 ते 15 अंश सेल्सिअस तापमान, रक्त गोठविणारी थंडी; कोल्हापूरच्या अन्वीने केदारकंठा शिखरावर साजरी केली शिवजयंती उणे 6 ते 15 अंश सेल्सिअस तापमान, रक्त गोठविणारी थंडी; कोल्हापूरच्या अन्वीने केदारकंठा शिखरावर साजरी केली शिवजयंती
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 395 व्या जयंतीचे औचित्य साधत कोल्हापूरच्या पाच वर्षांच्या शिवकन्येने हिमालय पर्वत रांगेतील केदारकंठा...
“छावा चित्रपटात चुकीचा इतिहास दाखवला”, दिग्दर्शकावर गणोजी शिर्केंच्या वंशजांचे गंभीर आरोप
माझा जन्म जैविक नाही वगैरे म्हणणाऱ्यांवर आपण किती विश्वास ठेवायचा?, मोदींचं नाव न घेता संमेलनाध्यक्ष डॉ. भवाळकर यांची टीका
हिंदुस्थानात पुढील 5 वर्षात इलेक्ट्रिक वाहनांची संख्या 2.80 कोटींहून अधिक होणार, IESA चा अहवाल
Ranji Trophy – अंतिम फेरीत विदर्भला भीडणार ‘हा’ संघ, पहिल्यांदाच फायनलमध्ये मारलीये एन्ट्री
Ratnagiri News – कासवांच्या वेळास गावात 32 घरट्यात 3579 अंडी संरक्षित, 50 पिल्ले समुद्रात झेपावली
दहावी पेपर फुटीप्रकरणी शालेय शिक्षण मंत्र्यांची महत्वाची माहिती, नेमका काय घडला प्रकार?