‘शक्तीपीठ’ विरोधात शक्तिप्रदर्शन! न्यायालया ऐवजी रस्त्यावरची लढाई, 12 मार्चला विधानसभेवर भव्य मोर्चा
शक्तीपीठ महामार्ग बाधित 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची राज्यव्यापी बैठक, विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शाहू स्मारक भवन येथे संपन्न झाली. यावेळी बोलताना त्यांनी शक्तीपीठ महामार्गाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली. राज्यात सत्तेत असणाऱ्या लोकांना कोल्हापूरची मोठी धास्ती होती, म्हणून कोल्हापूर पुरता महामार्ग रद्दचा निर्णय सत्तेतील काही मंत्र्यांनी जाहीर केला. मात्र याला कायदेशीर आधार नाही. सरकार मध्ये राहायचं आणि त्यांच्याच मंत्र्यांनी आणि आमदारानी वेगवेगळी स्टेटमेंट करायचं हे सरकारच षडयंत्र असल्याची टीका आमदार सतेज पाटील यांनी केली.
गोव्याकडे जाण्यासाठी पर्यायी रस्त्या असताना सुद्धा शक्तीपिठ का लादला जातं आहे. 86 हजार कोटीचा हा प्रकल्प असल्याचं सांगण्यात येत आहे. एवढी मोठी रक्कम पाहता एका किलो मीटरला 110 कोटींचा खर्च येणार आहे. शक्तिपीठमध्ये कोण फितूर होऊ नये यासाठी काळजी घेऊया. न्यायालयात जाण्याऐवजी ही लढाई रस्त्यावर करूया, असं ते म्हणाले.
येणाऱ्या अधिवेशनात महाविकास आघाडी म्हणून आम्ही सर्व जण ताकतीने प्रश्न मांडू. आपापल्या जिल्ह्यातील आमदारांचे शक्तीविरोधाबाबत पत्र घ्या. शेतकऱ्याला देशोधडीला लावणारा हा प्रकल्प असून अर्थसंकल्पीय अधिवेशन काळात 12 मार्चला भव्य मोर्चा काढणार असल्याचं सतेज पाटील यांनी जाहिर केल. शेतकऱ्यांची ताकत सरकारला दाखऊन देऊ. मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी व्हा, असं आवाहनही त्यांनी केलं. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे कोल्हापूर सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांनी शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात शेतकऱ्यांच्या भावना तीव्र आहेत. आता या लढ्याला कोल्हापुरातून सुरुवात झाली आहे, असं म्हटलं आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List