Google Pay वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, ‘या’ पेमेंटसाठी भरावा लागणार एक्स्ट्रा कर
डिजिटल पेमेंटने म्हणजेच UPI मुळे पैशांचे सगळे व्यवहार सोपे झाले आहेत. डिजिटल पेमेंटने हिंदुस्थानातील आर्थिक व्यवहारांचे स्वरूप बदलून टाकले आहे. मात्र, आता Google Pay वापरणाऱ्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. कोणत्याही प्रकारच्या बिल पेमेंटसाठी आता ग्राहकांना सुविधा शुल्क भरावा लागणार आहे. गुगलने वापरकर्त्यांकडून सुविधा शुल्क आकारण्यास सुरुवात केली असल्याचा दावा Google Pay वापरणाऱ्यांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, तुम्ही देखील बिल पेमेंटसाठी Google Pay वापरत असाल तर सुविधा शुल्क भरण्यास तयार राहा. कारण बिल पेमेंटसाठी जर तुम्ही क्रेडिट किंवा डेबिट कार्ड वापरत असाल तर तुमच्यावर 0.5% ते 1% शुल्क आकारले जाईल, अशी माहिती इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तात देण्यात आली आहे. या शुल्काव्यतिरिक्त, तुम्हाला जीएसटी देखील भरावा लागेल. आतापर्यंत Google Pay ने बिल पेमेंटसाठी वापरकर्त्यांकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले नव्हते. मात्र, गुगल पे कडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही.
गेल्या वर्षभरापासून Google Pay त्यांच्या वापरकर्त्यांकडून मोबाईल शुल्कावर 3 रुपये सुविधा शुल्क आकारत आहे, अशी माहिती इकॉनॉमिक टाईम्सच्या अहवालात नमूद केली आहे. अहवालात असे म्हटले आहे की जेव्हा एखादा ग्राहकाने वीज बिल भरण्यासाठी क्रेडिट कार्डचा वापर करतो तेव्हा अॅपवर वापरकर्त्याकडून 15 रुपये सुविधा शुल्क आकारले जात आहे. हे शुल्क अॅपमध्ये डेबिट/क्रेडिट कार्ड व्यवहारांसाठी प्रक्रिया शुल्क या नावाने दाखवले जात आहे. ज्यामध्ये जीएसटीचाही समाविष्ट आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List