‘जय माँ लक्ष्मी’च्या सेटवर निर्मात्याकडून अभिनेत्याला मारहाण; धक्कादायक कारण आले पुढे

‘जय माँ लक्ष्मी’च्या सेटवर निर्मात्याकडून अभिनेत्याला मारहाण; धक्कादायक कारण आले पुढे

चित्रपट वा मालिकांचे शुटींग म्हटले की ते काही सोप्पं काम नाही. प्रत्येकाचे शेड्युल फार त्रासदायी असते. त्यातून सेटवर चीडचीड होण्याचे प्रकार अधूनमधून घडतच असतात. पण ‘जय माँ लक्ष्मी’ टीव्ही शोच्या सेटवरचा वाद बाचाबाचीवरून थेट मारामारीपर्यंत पोहचला.

हाताला दुखापत झालेली असतानाही शूटिंगसाठी आलेल्या अभिनेता शान मिश्राला निर्मात्याने शूटिंग पूर्ण करूनच जाण्याची अट घातली. त्यावर शानने शूटिंग पूर्ण करू शकत नसल्याचे सांगताच निर्माता मंगेश जगताप याने त्याच्यावर हल्ला केला. याबाबत अभिनेता शान मिश्राने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. अभिनेता शान आणि निर्माता मंगेश यांच्यात कडाक्याचे भांडण होऊन नंतर शानच्या पाठीवर गंभीर मारहाण करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.

शान आणि मंगेश यांच्यातील भांडणाचे रेकॉर्डिंग केले जात होते. ते रेकॉर्डिंग थांबवण्यास शानने नकार दिला. त्यामुळे निर्माता मंगेशचा पारा आणखीन चढला आणि शानला पुन्हा मारहाण करण्यात आली. यावेळी निर्मात्याच्या पत्नीनेदेखील शानवर आरडाओरड केल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. ही घटना टीव्ही शोच्या जगतात चर्चेचा विषय बनली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

संतोष देशमुखांच्या लेकीची आर्त हाक, मुंबईत निघणार जनआक्रोश मोर्चा, तारीख आणि ठिकाण ठरलं संतोष देशमुखांच्या लेकीची आर्त हाक, मुंबईत निघणार जनआक्रोश मोर्चा, तारीख आणि ठिकाण ठरलं
बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने जनआक्रोश...
Samsung Galaxy S25 सीरीज AI फीचर्स आणि 12GB RAM सह झाली लॉन्च, जाणून घ्या किंमत
नवीन Honda Activa हिंदुस्थानात लॉन्च; मिळणार अपडेटेड इंजिन अपडेट, जाणून घ्या किंमत…
अमित शाह यांनी जवळ बोलावून खुर्चीवर बसवलं, कानात काय सांगितलं?; भुजबळ काय म्हणाले?
Mamta Kulkarni : न्यूड फोटोंची ब्लॅकने विक्री, अंडरवर्ल्ड ते साध्वी; ममता कुलकर्णीची थक्क करणारी गोष्ट!
मानधन वाढवून मागितले म्हणून मालिकेतून काढून टाकले, रात्रीस खेळ चाले’मालिकेतील अभिनेत्रीचा धक्कादायक दावा
प्रजासत्ताक दिनानिमित्त शिवसेनेचा भारतमाता पूजन आणि संविधान दिंडी सोहळा, उद्धव ठाकरे राहणार उपस्थित