नवीन Honda Activa हिंदुस्थानात लॉन्च; मिळणार अपडेटेड इंजिन अपडेट, जाणून घ्या किंमत…
Honda Motorcycle and Scooter India ने त्यांच्या लोकप्रिय स्कूटर Activa चे OBD2B- व्हर्जन लॉन्च केली आहे. ही स्कूटर 2025 मॉडेल OBD2B मानकांशी सुसंगत आहे. ॲक्टिव्हा ही देशातील सर्वाधिक विकली जाणारी स्कूटर आहे. त्यात काही नवीन फीचर्सचाही समावेश करण्यात आला आहे. नवीन ॲक्टिव्हा टीव्हीएस ज्युपिटरशी स्पर्धा करेल. या स्कूटरमध्ये तुम्हाला काय नवीन आणि खास मिळणार आहे, ते हे जाणून घेऊ…
फीचर्स
नवीन Activa मध्ये 4.2-इंचाचा TFT डिस्प्ले, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, USB Type-C चार्जिंग पोर्ट आणि आयडलिंग स्टॉप सिस्टीम आहे. ही स्कूटर खास तरुणाईला लक्षात ठेवून डिझाइन करण्यात आली आहे.
इंजिन आणि पॉवर
नवीन Activa मध्ये 109.51cc सिंगल सिलिंडर PGM-Fi इंजिन आहे. जे आता OBD2B अनुरूप आहे. हे इंजिन प्रदूषण कमी करण्यात मदत करते. याचे इंजिन 5.88 kW ची पॉवर आणि 9.05 Nm टॉर्क जनरेट करते.
किती आहे किंमत?
नवीन Honda Activa ची एक्स-शोरूम किंमत 80,950 रुपयांपासून सुरू होते. ही एसटीडी, डीएलएक्स आणि एच-स्मार्ट या तीन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List