मानधन वाढवून मागितले म्हणून मालिकेतून काढून टाकले, रात्रीस खेळ चाले’मालिकेतील अभिनेत्रीचा धक्कादायक दावा

मानधन वाढवून मागितले म्हणून मालिकेतून काढून टाकले, रात्रीस खेळ चाले’मालिकेतील अभिनेत्रीचा धक्कादायक दावा

‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेबरोबरच त्यातील कलाकारही तितकेच चर्चेत आले. प्रत्येकाने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले होते. त्यातलेल एक पात्र संजीवनी पाटील म्हणजेच वच्छी.या मालिकेतील त्यांच्या अभिनयामुळे त्यांना वेगळी ओळख मिळाली. विशेष म्हणजे वच्छीचा लग्नातील मिरवणुकीतूल अतरंगी डान्स प्रेक्षकांच्या आजही स्मरणात आहे. त्यांनी नुकत्याच एका मुलाखतीत ‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेत मानधन वाढवून मागितले म्हणून काढून टाकल्याचा धक्कादायक दावा केला आहे.

संजीवनी पाटील यांनी नुकतीच एका युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. त्यावेळी त्यांनी कलाकारांना मिळणाऱ्या मानधनाबाबत भाष्य केले, त्या म्हणाल्या, आता मी काही निकष ठरवले असून दोन-तीन हजारात काम करणार नाही. वच्छीची भूमिका ही मरणारी होती का? मरण खरंच होते का त्या भूमिकेला? असे प्रश्न विचारत ती भूमिका खरंच खूप मोठी झाली असती. मात्र वच्छीने पर-डे मानधन वाढवायला सांगितले होते.त्यामुळे मालिकेत थेट भूमिकेलाच मारुन टाकले.

संजीवनी पाटील पुढे म्हणाल्या, मालिकेंमुळे प्रसिद्धी मिळतेच पण पैशांचे काय? नवऱ्याची पोलीसाची नोकरी असली तरी घर आम्हालाही चालवायचे असते. कायम हे बजेट आमचं नाही असे बोलून डावलले जाते मग,आमचे बजेट असे केव्हापासून लोकं बोलणार, 2012 साली मी दोन ते तीन हजारात काम केले आणि आताही मी तेवढ्याच पैशांमध्ये काम करावे अशी इच्छा असेल तर मी घरी बसणे पसंत करेन अशी रोखठोक भूमिकाच मांडली. 2024 मध्येही मालिकांच्या ऑफर आल्या होत्या. पण मानधनाचे नीट जुळले नाही. साडेतीन हजारांच्या पुढे जात नव्हते. मी दरदिवसाला दहा हजाराची अपेक्षा करत नाही मात्र योग्य मानधनाची अपेक्षा नक्कीच करु शकते.

पुढे म्हणाल्या, मोठ्या कलाकारांना तुम्ही पर-डे चांगले मानधन देता. मग, माझ्यासारख्या मातीतल्या कलाकारांना का डावलले जाते? पण, आता मी त्या गोष्टीचा विचार करत नाही. विचार करून काम निवडते आणि येत्या काळात मला भरपूर काम करायचं आहे असे संजीवनी यांनी व्यक्त केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

हिंदुस्थानी खेळाडूविना आयसीसीचा सर्वोत्तम वन डे संघ हिंदुस्थानी खेळाडूविना आयसीसीचा सर्वोत्तम वन डे संघ
आयसीसीने ‘सर्वोत्तम एकदिवसीय संघा’ची घोषणा करताना हिंदुस्थानी क्रिकेटप्रेमींना आश्चर्याचा धक्का दिला आहे. आयसीसीने 2024 या वर्षी सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा...
अर्थवृत्त – शेअर बाजारात चढ-उतार
सेलिबी नास कंपनीच्या कामगारांना घसघशीत पगारवाढ, भारतीय कामगार सेनेच्या प्रयत्नांना यश
बीड, परभणीतील हत्याकांडाच्या निषेधार्थ आज मुंबईत जनआक्रोश मोर्चा
दृष्टिहीनांच्या बुद्धिबळ स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
शिवसेनाप्रमुखांच्या जन्मदिनानिमित्त विविध उपक्रम
शिवसेनेच्या वतीने दिंडोशीत सामाजिक उपक्रम