दिव्यात घंटागाडीने वृद्धाला चिरडले, 30 फूट फरफटत नेले

दिव्यात घंटागाडीने वृद्धाला चिरडले, 30 फूट फरफटत नेले

कचरा टाकण्यासाठी गेलेल्या वृद्धाला घंटागाडीच्या चालकाने चिरडले असल्याची धक्कादायक घटना दिव्यातील संतोषनगर येथे आज सकाळी घडली. या दुर्दैवी घटनेत जखमी झालेल्या सीताराम थोटम (79) यांना तत्काळ कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

दिवा पूर्व येथील टाटा पॉवर लाइनच्या बाजूला असलेल्या संतोषनगर येथे राहत असलेले सीताराम थोटम शुक्रवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास कचरा टाकण्यासाठी घराबाहेर पडले होते. त्यावेळी ठाणे महापालिकेच्या घंटागाडीचा चालक मनोज कदम आणि सफाई कर्मचारी प्रमोद भोईर यांनी वाहन रिव्हर्स गिअरमध्ये टाकले. त्यावेळी मागे कचरा टाकत असलेल्या सीताराम थोटम यांना त्यांनी धडक दिली. त्यानंतर घंटागाडीखाली अडकलेल्या थोटम यांना त्या गाडीने जवळपास 30 फूट फरफटत नेले.

काही लोकांनी आरडाओरडा करून गाडी थांबवली. गाडीखाली अडकलेल्या थोटम यांना बाहेर काढून तत्काळ कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले . मात्र तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले आहे. दरम्यान, याप्रकरणी घंटागाडी चालकावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून पालिका प्रशासनाने सिताराम थोटम यांच्या कुटुंबियांना दहा लाखांची आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी  शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे यांनी केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

हिंदुस्थानी खेळाडूविना आयसीसीचा सर्वोत्तम वन डे संघ हिंदुस्थानी खेळाडूविना आयसीसीचा सर्वोत्तम वन डे संघ
आयसीसीने ‘सर्वोत्तम एकदिवसीय संघा’ची घोषणा करताना हिंदुस्थानी क्रिकेटप्रेमींना आश्चर्याचा धक्का दिला आहे. आयसीसीने 2024 या वर्षी सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा...
अर्थवृत्त – शेअर बाजारात चढ-उतार
सेलिबी नास कंपनीच्या कामगारांना घसघशीत पगारवाढ, भारतीय कामगार सेनेच्या प्रयत्नांना यश
बीड, परभणीतील हत्याकांडाच्या निषेधार्थ आज मुंबईत जनआक्रोश मोर्चा
दृष्टिहीनांच्या बुद्धिबळ स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
शिवसेनाप्रमुखांच्या जन्मदिनानिमित्त विविध उपक्रम
शिवसेनेच्या वतीने दिंडोशीत सामाजिक उपक्रम