अभिनेता राजपाल यादवच्या वडिलांचे निधन, दिल्लीच्या एम्समध्ये सुरु होते उपचार
बॉलिवूड अभिनेता राजपाल यादव याच्यावर दुख:चा डोंगर कोसळला आहे. राजपाल यादव याचे वडील नौरंग यादव यांचे आज दिल्लीत निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे.
राजपाल यादवचे वडील नौरंग यादव अनेक दिवसांपासून आजारी होते. त्यांची प्रकृती खालावल्यानंतर त्यांना दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आले. येथे उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.राजपाल कामानिमित्त थायलंडमध्ये होता, वडिलांची तब्येत बिघडत असल्याचे कळताच त्याने तातडीने दिल्ली गाठली. दिल्ली एम्समधून वडिलांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी उत्तर प्रदेशातील शाहजहांपूरला नेण्यात येणार आहे. राजपाल यादवच्या वडिलांचे अंत्यसंस्कार त्यांच्या मूळ गावी करण्यात येणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
दोन दिवसापूर्वीच राजपाल यादवसह 4 स्टार्सनाही जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. त्याला पाकिस्तानकडून धमकीचा ईमेल आला होता.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List