छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर भारतीय कामगार सेनेकडून शिवसेनाप्रमुखांना आदरांजली

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर भारतीय कामगार सेनेकडून शिवसेनाप्रमुखांना आदरांजली

भारतीय कामगार सेना विमानतळ विभागाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, टर्मिनल-2 येथे आदरांजली वाहण्यात आली. शिवसेना नेते, भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष-खासदार अरविंद सावंत यांच्या हस्ते विमानतळावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळय़ावर पुष्पवृष्टी करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली व त्यानंतर बाळासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली.

तमाम भारतीयांचे श्रद्धास्थान असलेल्या शिवसेनाप्रमुखांना अभिवादन करण्यासाठी विमानतळावरील कामगार मोठय़ा संख्येने दाखल झाले होते. कार्यक्रमाला भारतीय कामगार सेनेचे कार्याध्यक्ष अजित साळवी, आमदार अनंत (बाळा) नर, मनोज जामसुतकर, महेश सावंत, हारून खान यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी भारतीय कामगार सेना विमानतळ विभागाच्या वतीने नवनिर्वाचित आमदारांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी सेलिबी नास एअरपोर्ट सर्व्हिसेस (इंडिया) प्रा. लि. पंपनीचे ऑपरेशन्स हेड सौरभ दळवी, सिक्युरिटी मॅनेजर पवन शर्मा, एचआर ऋतुराज हिरेखान आणि विमानतळ विभागातील विविध नामांकित कंपन्यांच्या व्यवस्थापनाच्या सदस्यांनी त्याचबरोबर विमानतळावर आलेल्या देशविदेशातील पर्यटकांनीदेखील बाळासाहेबांना आदरांजली वाहली. कार्यक्रमाचे आयोजन भारतीय कामगार सेनेचे संयुक्त सरचिटणीस संजय शंकर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. यावेळी भारतीय कामगार सेनेचे संयुक्त सरचिटणीस दिलीप जाधव, चिटणीस संतोष कदम, मयूर वणकर, सूर्यकांत पाटील, राजा ठाणगे, योगेश आवळे, दिलीप भट, सहचिटणीस मिलिंद तावडे, विजय शिर्पे, जगदीश निकम, संजीव राऊत, निलेश ठाणगे, दिनेश पाटील, विजय तावडे, दिनेश परब आदी उपस्थित होते.

Displaying koliwada.jpg

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त शीव-कोळीवाडा विधानसभेच्या ग्राहक संरक्षण कक्ष क्रमांक 175 च्या वतीने विभागातील विद्यार्थ्यांकरिता मोफत शालेय किटचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला शीव-कोळीवाडा विधानसभा प्रमुख गोपाळ शेलार, विधानसभा संघटक गजानन पाटील, उपविभागप्रमुख राजेश पुचिक, उपविभागप्रमुख प्रभाकर भोगले, शाखाप्रमुख संजय कदम, महिला शाखा संघटक जना नेलगे, ग्राहक संरक्षण कक्ष विधानसभा संघटक सुशील सुंकी, कार्यालय प्रमुख सुभाष भोगटे, कालिदास पोटे, उपशाखाप्रमुख तुकाराम महाडिक, गटप्रमुख युवासेना शाखाधिकारी अमर पालशेतकर उपस्थित होते. 

Displaying hinduja-Vaibav.JPG

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस आणि हिंदुजा रुग्णालयातील कामगारांच्या आधारवड स्वर्गीय माई हिंदुजा यांची पुण्यतिथी याचे औचित्य साधत हिंदुजा रुग्णालय युनिट भारतीय कामगार सेनेच्या वतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिराकरिता भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष शिवसेना नेते – खासदार अरविंद सावंत, कार्याध्यक्ष अजित साळवी, सरचिटणीस आमदार उपनेते सचिन अहिर यांचे मार्गदर्शन लाभले. रुग्णालयाचे सीओओ जॉय चक्रवर्ती, एच.आर. डायरेक्टर जगदीश चौहान, सहाय्यक डायरेक्टर सुरेश जाधव हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी 100 रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले. यावेळी भारतीय कामगार सेनेचे चिटणीस राम साळगावकर  सहचिटणीस रामपृष्ण शिंदे, युनिटचे अध्यक्ष अमित भाटे, उपाध्यक्ष रूपाली राणे, मुपुंद कदम, योगेश कापडोस्कर, जितू परदेशी, दत्ता साळवी, दत्ता पुमटकर, सचिन शिर्पे, रीमा कांबळे, विनायक चिमणे, संतोष मांजरेकर, महेश मोरे, प्रसाद नाईक, रूपेश मालप, ओमकार साळगावकर, संतोष परब आदि उपस्थित होते.

Displaying RCF-vaibhav.JPG

स्थानीय लोकाधिकार समिती आणि आरसीएफ कर्मचारी सेनेच्या वतीने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मादिनानिमित्त पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी आरसीएफ कर्मचारी सेनेचे दत्तात्रय परब, लोकाधिकार समितीचे अल्हाद महाजन, निलेश गावकर, जे. पी. सिंह, राजेंद्र कासार, मिलिंद पुलकर्णी, वैभव घरत, सुयोग हाडवळे, विवेक कांडारकर, विठ्ठल बोराटे, हनुमंत मोती, योगेश ठापूर, संजय वडाळ, दिनेश मोरे, बाबा उनावणे, राकेश गावंड, महेश राणा, भास्कर पाटील, विश्वनाथ बटवलकर, सतीश वाघमारे, आशीष राणे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. 

 

 

 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

प्रियंका चोप्राच्या चित्रपटाला ऑस्करचं नामांकन; 9 वर्षांच्या मुलीच्या कथेनं सर्वांची मन जिंकली प्रियंका चोप्राच्या चित्रपटाला ऑस्करचं नामांकन; 9 वर्षांच्या मुलीच्या कथेनं सर्वांची मन जिंकली
भारतासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. ऑस्कर पुरस्कार 2025 साठी जगभरातील चित्रपटांची यादी जाहीर करण्यात आलीये. यामध्ये भारतीय चित्रपटाला...
सैफ अली खानच्या हल्लेखोराने कसा केला भारतात प्रवेश? आरोपीच्या वडिलांकडून धक्कादायक माहिती समोर
कपूर घराण्यातील ही ‘सौंदर्यवती’ कधी पडद्यावर आलीच नाही; करिश्मा अन् करीनापेक्षा कमी नाही
Saif Ali Khan Attack : 10 मिनिटांवर लीलावती हॉस्पिटल, मग दीड तासाने का पोहोचला सैफ अली खान ? गोंधळ संपता संपेना
सैफची लाडकी लेक करोडपती मॉडेलसोबत रिलेशनमध्ये? अखेर खरं सांगितलंच
मी आणि करीना बेडरूममध्ये होतो तेव्हा…, सैफ अली खानने सांगितली धक्कादायक घटना
पहिला व्हर्टिकल लिफ्ट अप ब्रिज तयार