पहिला व्हर्टिकल लिफ्ट अप ब्रिज तयार
देशातील पहिला व्हर्टिकल लिफ्ट अप ब्रिज तयार झाला आहे. या ब्रिजचे नाव पंबन ब्रिज आहे. हा देशात समुद्रावर बनलेला पहिला पूल आहे. हा पूल पुढील 100 वर्षांपर्यंत सुरक्षित राहील. या पुलावरून चीनच्या कारवायांवर लक्ष राहणार आहे. श्रीलंकेने हंबनटोटामधील काही इन्फ्रास्ट्रक्चरचे काम चीनला दिले आहे. पंबन ब्रिजमुळे हंबनटोटावर चीनच्या कारवायावर नजर ठेवता येणार आहे. पंबन ब्रिजचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे रामेश्वरच्या समुद्रात वेगाने वारे वाहते. या ठिकाणी अनेकदा 100 किलोमीट वेगाने वारे वाहते. त्यामुळे सिग्नल विंड स्पीडशी कनेक्ट केले आहे. याचा फायदा म्हणजे ज्यावेळी ताशी 50 किलोमीटरच्या वेगाने वारे वाहतील, त्यावेळी तत्काळ ट्रेन आपोआप थांबेल. या ब्रिजची लांबी 2.2 किलोमीटर तर उंची समुद्रतळापासून 22 मीटर आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List