Photo – छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर निष्ठा, श्रद्धा आणि भक्तीचा त्रिवेणी संगम, उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडली
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी अंधेरीच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर शिवसैनिकांचा महासागर लोटला होता.
साहेबांच्या आठवणींना उजाळा देत समस्त हिंदू, निष्ठावंत शिवसैनिक, शिवसेनाप्रेमी आणि आबालवृद्ध नागरिक अंधेरीच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर उपस्थित होते.
शिवसेनेच्या महामेळाव्याच्या निमित्ताने शिवसैनिकांचे वादळच मुंबईत थडकले. याच वादळाच्या साक्षीने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडली.
निवडणुकीच्या निकालानंतर पहिल्यांदाच आपण समोरासमोर भेटतोय, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी या मेळाव्याला संबोधित करायला सुरुवात केली.
आपल्या 35 मिनिटांच्या तडाखेबंद भाषणात उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजप आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर चौफेर हल्ला करत अक्षरशः सालटी काढली.
‘या महाराष्ट्राने औरंगजेबाला झुकवले तिथे अमित शहा किस झाड की पत्ती, असे दरडावतानाच जेवढे अंगावर याल तेवढे वळ अंगावर घेऊन दिल्लीला जाल,’ असा हल्ला उद्धव ठाकरे यांनी चढवला.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने शिवसेनेच्या ऑनलाइन सक्रिय सदस्य नोंदणीचा शुभारंभ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List