Apple च्या वॉचमध्ये धोकादायक रसायन असल्याचा आरोप, कर्करोग होण्याची भिती!

Apple च्या वॉचमध्ये धोकादायक रसायन असल्याचा आरोप, कर्करोग होण्याची भिती!

स्मार्टवॉचबाबत तरुणामध्ये प्रचंड क्रेझ असून कंपन्या सतत एकामागून एक स्मार्टवॉच बाजारात आणत आहेत. मात्र फिटनेस वॉचबाबत एक धक्कादायक प्रकरण समोर आली आहे. Appleचे वॉच वापरणाऱ्यांसाठी ही बातमी आहे. एका अहवालानुसार फिटनेसवर नजर ठेवण्यासाठी Appleचे वॉच वापरले जाते मात्र त्याच्या बॅण्डने कॅन्सरचा धोका होऊ शकतो असा दावा करण्यात आला आहे. Apple वर Apple वॉच बँड विकल्याचा आरोप आहे ज्यात PFAS म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हानिकारक रसायनचा वापर केला गेला आहे.

द रजिस्टरनुसार, कॅलिफोर्नियाच्या नॉर्दर्न डिस्ट्रिक्टमध्ये नुकत्याच दाखल केलेल्या एका खटल्यात Apple वर स्पोर्ट बँड, ओशन बँड आणि नायकी स्पोर्ट बँड या तीन प्रकारच्या बँडमध्ये धोकादायक रसायन असल्याचा आरोप करण्यात आला आहे.खरंतर, स्पोर्ट बॅण्ड हा बेसिक मॉडल Apple वॉच सोबत येतो. ओशन आणि नायकी स्पोर्ट बॅण्ड हा नायकी ब्रॅण्डेड Apple वॉच सोबत येतो. Appleने तिन्ही बॅण्ड हे फ्लोरोएलास्टोमर हे रसायन वापरुन बनवले आहे. ज्यामुळे खटल्यात आरोप करण्यात आला आहे की, पेर आणि फ्लोरोएल्काइल हे त्या वस्तूतील PFAS हे धोकादायक रसायन लपवते. पीएफएएस हे रसायन ग्राहक उत्पादनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरली जातात. या रसायनांमुळे कर्करोगाचा धोका, कमकुवत रोगप्रतिकारशक्ती आणि गर्भातील बाळाला संभाव्य धोकाही होऊ शकतो. याला फॉरएवर रसायनाच्या रुपाने ओळखले जाते .

हे रसायन अत्यंत धोकादायक असून ते बॅण्डच्या माध्यमातून त्वचेच्या दीर्घकाळ संपर्कात येते आणि घाम आणि छिद्रांद्वारे रसायन शरीरात प्रवेश करू शकते. खटल्यात नॉट्रे डेम विद्यापीठाने केलेल्या 2024 चा अभ्यासाचा हवाला दिला आहे, ज्यामध्ये Appleसह अनेक स्मार्टवॉच बँडमध्ये PFAS या धोकादायक रसायनाची उच्च पातळी आढळली. संशोधकांना काही बँडमध्ये परफ्लुओरोहेक्सानोइक अॅसिड (PFHxA) चे उच्च प्रमाण आढळले. 2022 पर्यंत आपल्या उत्पादनांमधून PFAS काढून टाकण्याची वचनबद्धता असूनही Appleने जाणूनबुजून हे बँड विकल्याचा दावा खटल्यात करण्यात आला आहे. यामध्ये कंपनीवर फसवणूक, निष्काळजीपणा आणि कॅलिफोर्नियाच्या ग्राहक संरक्षण कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला आहे.त्यामुळे याचिकाकर्त्याने कोर्टाचे दरवाजे ठोठावले आहेत.

PFAS या रसायनाबद्दल चिंता वाढत असताना ग्राहकांना सिलिकॉन किंवा PFAS-मुक्त बँड सारखे सुरक्षित पर्याय निवडण्याचे आवाहन केले जात आहे.Appleकडून या खटबाबत कोणतेही भाष्य समोर आलेले नाही.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आनंदाची बातमी, Amul दूधाच्या किमंती कमी होणार , पाहा काय झाला निर्णय आनंदाची बातमी, Amul दूधाच्या किमंती कमी होणार , पाहा काय झाला निर्णय
दूधाचा प्रसिद्ध ब्रँड अमुलने आपल्या दूधाच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या २६ जानेवारीच्या आधी ही दर कपात होत...
आमदारांच्या बैठकीत काय ठरलं? धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत अजितदादांच्या शिलेदाराकडून आतली बातमी समोर
सर्वसामान्यांना झटका, टॅक्सी आणि रिक्षाचीही भाडेवाढ होणार, प्रतिकिमी मागे वाढणार ‘इतके’ रुपये
भगवे वस्त्र, गळ्यात रुद्राक्षाच्या माळा अन्… ममता कुलकर्णीने घेतला संन्यास, साध्वी बनत नावात केला मोठा बदल
कॉम्प्युटर पेक्षाही वेगवान होईल तुमच्या मुलाचा मेंदू, मुलांच्या आहारात करा या पाच गोष्टींचा समावेश
Onion Benefits : लठ्ठपणामुळे त्रस्त आहात? झटपट वजन कमी करण्यासाठी ‘हा’ पदार्थ ठरेल फायदेशीर…
कंगना राणौत अडचणीत, कॉपीराइट प्रकरणात पाटणा उच्च न्यायालयाकडून नोटीस