शहांवरील संस्कार कोल्हापूरचे वाटत नाहीत, गृहमंत्र्यांनी तारतम्य ठेवून भाष्य करावं – शरद पवार
”अमित शहा यांच्या बोलण्याचा जो टोन आहे, तो अति टोकाचा आहे. देशाच्या गृहमंत्र्यांनी तारतम्य ठेवून भाष्य करणे अपेक्षित आहे. पण त्याची त्याची प्रचिती इथे येत नाही. खरं म्हटलं, तर हे काही कोल्हापूरचे संस्कार वाटत नाही. त्यामुळे अमित शहा हे कोल्हापूरमध्ये शिकले की आणखी कुठे शिकले माहित नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले आहेत.
देशाचे गृहमंत्री अमित शहा हे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर असून त्यांनी मालेगाव येथील सभेत म्हटलं होतं की, 10 मंत्री कृषिमंत्री असताना सहकार क्षेत्रासाठी काय केलं. देशासाठी आणि शेतकर्यांसाठी काय केलं याचा हिशोब पवारांनी द्यावा, असं शहा म्हणाले. यालाच प्रत्युत्तर देत शरद पवार यांनी असं वक्तव्य केलं आहे.
शरद पवार म्हणाले की, अलीकडे अमित शहा सतत जे काही बोलतात, त्याची नोंद महाराष्ट्रातल्या राजकीय नेत्यांनी घेतली आहे. विरोधकांनी घेतली आहे. अमित शहा यांचा बोलण्याचा टोन अतिटोकाचा आहे. देशाचा गृहमंत्री काही तारतम्य ठेवून भाष्य करतील, अशी अपेक्षा असते. पण अमित शहा यांच्याकडून तसं काही दिसून येत नाही.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List