चेन्नईत खेळला जाणार हिंदुस्थान आणि इंग्लंडमधील दुसरा T20 सामना, जाणून घ्या कसं असेल हवामान

चेन्नईत खेळला जाणार हिंदुस्थान आणि इंग्लंडमधील दुसरा T20 सामना, जाणून घ्या कसं असेल हवामान

टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यातील T20 मालिकेतील दुसरा सामना शनिवार (25 जानेवारी) चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना कोलकाता येथे खेळला गेला. हिंदुस्थानने हा सामना सात विकेटने जिंकला. हिंदुस्थानी संघाला हा सामना जिंकून मालिकेत 2-0 अशी आघाडी घ्यायची आहे, तर इंग्लंडला हा सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधायची आहे. यातच सामन्यादरम्यान चेन्नईचे हवामान कसं असेल, याचा सामन्यावर काही परिणाम होणार का? असा प्रश्न अनेक क्रिकेट चाहत्यांना पडला आहे. याचबद्दल जाणून घेऊ…

कसं असेल हवामान?

हिंदुस्थान आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या T20 सामन्याच्या हंगामाविषयी बोलायचे झाले तर चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. शनिवारी पावसाची अजिबात शक्यता नाही. चेन्नईचे हवामान बहुतांशी उष्ण असते. तापमानाबद्दल बोलायचे तर ते 23 अंश ते 29 अंश सेल्सिअस दरम्यान राहू शकते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

सत्र न्यायालयाचा ईडीला झटका, अनिल देशमुख यांच्या पासपोर्ट नूतनीकरणाला मुभा सत्र न्यायालयाचा ईडीला झटका, अनिल देशमुख यांच्या पासपोर्ट नूतनीकरणाला मुभा
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आपला पासपोर्ट दहा वर्षांसाठी नूतनीकरण करण्यास विशेष पीएमएलए न्यायालयाने परवानगी दिली. देशमुख...
शिवसेनेच्या वतीने आज राज्यभरात संविधान आणि भारतमातेचे पूजन
अजित पवार समर्थकांमध्ये खळबळ, अमित शहांच्या दौऱ्यात भुजबळांची जवळीक चर्चेत
Costal Road कोस्टल रोड उद्यापासून पूर्ण क्षमतेने खुला
भंडाऱ्यात आयुध निर्माण कारखान्यात भीषण स्फोट; 8 कामगार ठार
1 फेब्रुवारीपासून प्रवास महागणार! रिक्षा-टॅक्सीसाठी 3 रुपये तर एसटीची 15 टक्के भाडेवाढ
अमित शहांवरील संस्कार कोल्हापूरचे वाटत नाहीत! शरद पवारांचा सणसणीत टोला