प्रसिद्ध अभिनेता अमन जैस्वालचे अपघाती निधन, जोगेश्वरी पुलावर बाईकला ट्रकने उडवले
हिंदी मालिकासृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता अमन जैस्वाल (22) याच्या बाईकला एका ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात अमनचा जागीच मृत्यू झाला. अमन ऑडिशनसाठी जात असताना जोगेश्वरी पुलावर त्याचा अपघात झाला.
अमन जैस्वाल हा मूळचा उत्तर प्रदेशमधील बलिया येथील असून तो अभिनय क्षेत्रात काम करण्यासाठी मुंबईत आला होता. त्याने धरतीपुत्र नंदिनी या मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती. तसेच सोनी टीव्हीवरील पुण्यश्लोक अहिल्याबाई या मालिकेत त्याने यशवंतराव फणसे यांची भूमिका साकारलेली.,
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List