Saif Ali Khan सैफ अली खानवरील हल्ल्याप्रकरणी आणखी एका संशयिताला घेतले ताब्यात
अभिनेता सैफ अली खान याच्यावरील हल्ल्याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी आणखी एका संशयिताला ताब्यात घेतेल आहे. याप्रकरणाती एका आरोपीला शुक्रवारी सकाळी ताब्यात घेण्यात आले होते. आता एकूण ताब्यात घेतलेल्या आरोपींची संख्या दोन झाली आहे.
सैफ अली खान याचे वांद्रे पश्चिम येथे घर असून मध्यरात्री अडीचच्या सुमारास त्याच्या घरात चोराने प्रवेश केला. याची चाहूल लागल्यानंतर घरात काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याने चोराला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र चोराने तिच्यावर चाकूने वार केला. तिचा आरडाओरडा ऐकून सैफ अली खान याने तिकडे धाव घेतली. यावेळी चोर आणि सैफमध्ये झटापट झाली. या दरम्यान चोराने सैफ अली खानवर एकामागोमाग एक चाकूने सपासप वार केला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List