Russia-Ukraine war: रशियन सैन्यात कार्यरत असलेल्या 12 हिंदुस्थानींचा मृत्यू,16 बेपत्ता; परराष्ट्र मंत्रालयाने काय दिली माहिती? वाचा..

Russia-Ukraine war: रशियन सैन्यात कार्यरत असलेल्या 12 हिंदुस्थानींचा मृत्यू,16 बेपत्ता; परराष्ट्र मंत्रालयाने काय दिली माहिती? वाचा..

युक्रेनसोबत सुरू असलेल्या युद्धात रशियन सैन्य दलात सेवा देणाऱ्या 12 हिंदुस्थानींचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी दिली. मंत्रालयाने सांगितले की, सुमारे 18 हिंदुस्थानी नागरिक अजूनही रशियन सैन्यात सेवा देत आहेत. त्यापैकी 16 जण बेपत्ता आहेत.

याबाबत माहिती देताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले, “रशियन सैन्यात कार्यरत असलेल्या हिंदुस्थानी नागरिकांची 126 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. या 126 प्रकरणांपैकी 96 लोक हिंदुस्थानात परतले आहेत आणि त्यांना रशियन सशस्त्र दलातून सुट्टी देण्यात अली आहे.”

ते म्हणाले की, ”18 हिंदुस्थानी नागरिक अजूनही रशियन सैन्यात आहेत आणि त्यापैकी 16 बेपत्ता आहेत.” जैस्वाल म्हणाले, “रशियन बाजूने त्यांना बेपत्ता म्हणून वर्गीकृत करण्यात आलं आहे. आम्ही वाचलेल्या हिंदुस्थानी नागरिकांना तात्काळ सैन्यातून सुट्टी देऊन मायदेशी परत पाठवण्याची मागणी करत आहोत.”

या आठवड्याच्या सुरुवातीला समोर आलेल्या माहितीनुसार, रशियन सैन्यात तैनात असलेल्या केरळ येथील एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर त्याच्या नातेवाईकाला गंभीर दुखापत झाली. मृतकाचे नाव बिनिल टीबी असल्याचं सांगण्यात येत आहे. बिनिलच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त करताना जयस्वाल म्हणाले, “बिनीलचा मृत्यू अत्यंत दुर्दैवी आहे. आम्ही कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत. आमचे दूतावास रशियन अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे, जेणेकरून त्यांचे पार्थिव लवकरात लवकर हिंदुस्थानात परत आणता येईल. जखमी झालेल्या आणखी एका व्यक्तीवर मॉस्कोमध्ये उपचार सुरू आहेत. उपचार पूर्ण करून तो लवकरच देशात परतेल, अशी अपेक्षा आहे.”

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

बायको दारू पिते ही क्रूरता नाही! हायकोर्टाने नवऱ्याची ‘उतरवली’ बायको दारू पिते ही क्रूरता नाही! हायकोर्टाने नवऱ्याची ‘उतरवली’
बायकोला दारूचे व्यसन असल्याचे सांगत घटस्पह्ट मागणारा नवरा उच्च न्यायालयात तोंडावर आपटला. बायकोला दारू पिण्याची सवय असणे ही क्रूरता नाही....
रेडिओ सिटीवरील जाहिरातींसाठी सरकारकडून 44 कोटींचा चुराडा
जैन धार्मिक शिक्षण संघाकडून 25 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा
चीनमध्ये म्हातारे वाढले
लग्न, पूजेत ठीक आहे पण राजकारणात धर्म कशाला, प्रणिती शिंदे यांचा सवाल
व्हाईट हाऊस हल्ल्याप्रकरणी हिंदुस्थानी नागरिकाला कैद
Kho Kho Worldcup -बांगलादेशचा धुव्वा उडवत हिंदुस्थानी महिलांचा उपांत्य फेरीत प्रवेश,