‘मी आणि अर्जुनने…’ पृथ्वी शॉ ला आली सचिनच्या मुलाची आठवण, सांगितला 2011 वर्ल्डकपमधील किस्सा

‘मी आणि अर्जुनने…’ पृथ्वी शॉ ला आली सचिनच्या मुलाची आठवण, सांगितला 2011 वर्ल्डकपमधील किस्सा

मुंबईच्या ऐतिहासिक वानखेडे स्टेडयमवर मुंबईच्या माजी कर्णधारांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला खराब कामगिरीमुळे टीकाकारांच्या निशाण्यावर असलेला पृथ्वी शॉ सुद्दा उपस्थित होता. यावेळी त्याने अर्जुन तेंडूलकर सोबतचा 2011 विश्वचषक फायलनमधला एका किस्सा सर्वांना सांगितला.

मुंबईतील ऐतिहासिक वानखेडे क्रिकेट स्टेडियमने यावर्षी आपले अर्ध शतक पूर्ण केले आहे. यासाठी 19 जानेवारी रोजी स्टेडियमवर भव्यदिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. परंतु यापूर्वी स्टेडियममध्ये मुंबई संघाचे नेतृत्व केलेल्या माजी कर्णधारांचा एक सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला पृथ्वी शॉ सुद्दा उपस्थित होता. सध्या पृथ्वी हा खराब कामगिरी, फिटनेसमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. दरम्यान, त्याने या सोहळ्यानिमित्त सचिन तेंडूलकरचा मुलगा अर्जुन तेंडूलकर सोबतचा एक मजेशीर किस्सा सांगितला आहे.

हिंदुस्थानने 2011 चा विश्वचषक उंचावला तेव्हा हा ऐतिहासिक सामना पृथ्वीने अर्जुन तेंडूलकरसोबत वानखेडे स्टेडियममध्ये पाहिला होता. तेव्हा त्याचे वय फक्त 11 वर्ष होते. “या स्टेडियमसोबत माझी पहिली आठवण मी कधीही विसरू शकत नाही. जेव्हा मी इथे वर्ल्डकप फायनल पहायला आलो होतो. तेव्हा मी 11 वर्षांचा होतो. मी आणि अर्जुन आम्ही एकत्र फायनलचा सामना लाईव्ह बघीतला होता. टीम इंडियाने ट्रॉफी उंचावली तो क्षण मी कधीही विसरू शकत नाही. लहान असताना मी नेहमी विचार करायचो की, कधी मला वानखेडे स्टेडियमवर खेळण्याची संधी मिळतीये आणि आता पहा या स्टेडियमचा 50 वा वर्धापनदिन आपण साजरा करत आहोत. हा खास सोहळा आपण सर्वांनी मिळून साजरा केला पाहिजे.” असे पृथ्वी शॉ ने यावेळी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

बायको दारू पिते ही क्रूरता नाही! हायकोर्टाने नवऱ्याची ‘उतरवली’ बायको दारू पिते ही क्रूरता नाही! हायकोर्टाने नवऱ्याची ‘उतरवली’
बायकोला दारूचे व्यसन असल्याचे सांगत घटस्पह्ट मागणारा नवरा उच्च न्यायालयात तोंडावर आपटला. बायकोला दारू पिण्याची सवय असणे ही क्रूरता नाही....
रेडिओ सिटीवरील जाहिरातींसाठी सरकारकडून 44 कोटींचा चुराडा
जैन धार्मिक शिक्षण संघाकडून 25 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा
चीनमध्ये म्हातारे वाढले
लग्न, पूजेत ठीक आहे पण राजकारणात धर्म कशाला, प्रणिती शिंदे यांचा सवाल
व्हाईट हाऊस हल्ल्याप्रकरणी हिंदुस्थानी नागरिकाला कैद
Kho Kho Worldcup -बांगलादेशचा धुव्वा उडवत हिंदुस्थानी महिलांचा उपांत्य फेरीत प्रवेश,