निकष डावलून अर्ज भरलेल्या लाडक्या बहिणींचे पैसे बंद होणार
विधानसभा निवडणुका झाल्यानंतर आता महायुती सरकारने लाडक्या बहिणींना मोठा धक्का देण्याची तयारी सुरू आहे. या सरकारी योजनेचे फायदे उकळण्यासाठी निकषांच्या बाहेर जाऊन अर्ज भरलेल्या महिलांचे अर्ज बाद करण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतल्याची माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज दिली.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता सरकारने लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा केला आहे. काही लाभार्थी महिलांना सहा महिन्यांना सहा महिन्यांचे हप्ते एकत्रितपणे बँक खात्यात जमा केलेले आहेत. पण आता काही लाभार्थी महिला अपात्र ठरण्याची शक्यता आहे. कारण या योजनेतील लाभार्थी महिलांच्या संदर्भात तक्रारी सरकारकडे आल्या आहेत.
लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात पाच प्रकारच्या तक्रारी महिला व बाल कल्याण विभागाकडे आलेल्या आहेत. या तक्रारींची वेगवेगळ्या दिशेतून तपासणी होत आहे. काही तक्रारी या स्थानिक प्रशासनाकडून आलेल्या आहेत तर काही तक्रारी लाभार्थी महिलांनी आपण या योजनेसाठी पात्र नसल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे तक्रारी प्राप्त झालेल्या अर्जांची तपासणी होणार आहे. मात्र मूळ जीआरमध्ये कोणताही बदल होणार नाही असे महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या.
या अर्जांची पडताळणी
- अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक वार्षिक उत्पन्न असलेल्या महिला
- चारचाकी वाहने असलेल्या महिला
- लग्नानंतर महिला महाराष्ट्र राज्यातून इतर राज्यात स्थलांतरित झाली असल्यास
- आधारकार्ड व अन्य कागदपत्रांमध्ये नावात तफावत असलेले अर्ज
सरसकट कोणत्याही अर्जांची छाननी होणार नाही. उत्पन्नात वाढ होऊन अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक वार्षिक उत्पन्न गेले असल्यास त्या महिला योजनेसाठी पात्र ठरणार नाहीत.
आदिती तटकरे,
महिला व बाल कल्याण मंत्री
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List