शेतकऱ्यांनी घडवली जलक्रांती! ‘सागदरा उपसा सिंचन’ योजना एकीच्या बळावर केली पूर्ण, सर्वत्र कौतुक

शेतकऱ्यांनी घडवली जलक्रांती! ‘सागदरा उपसा सिंचन’ योजना एकीच्या बळावर केली पूर्ण, सर्वत्र कौतुक

धामणी (ता.आंबेगाव) येथील ‘सागदरा उपसा सिंचन’ योजनेच्या माध्यमातून साठ शेतकऱ्यांनी एकत्र येत उपसा सिंचन योजना पूर्ण करत दुष्काळग्रस्त भागात जलक्रांती घडवून आणली आहे, शेतकऱ्यांच्या या एकीच्या बळावर केलेल्या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागातील धामणी हे दुष्काळी गाव म्हणून ओळखले जाते आहे.या परिसरात पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने दरवर्षी दुष्काळ ठरलेला. त्यातच पूर्व भागातील लोणी धामणी सह सहा गावांना वरदान ठरणारी म्हाळसाकांत जलसिंचन योजना अजूनही मार्गी लागत नसल्याने या परिसरात शेतकरी एकत्र येत स्वखर्चाने डिंभे धरणाच्या उजव्या कालव्यातून आठ दहा किलोमिटर वरून पाईप लाईन करत आहेत.

धामणीतील चाडदरा येथील तब्बल आठ शेतकऱ्यांनी एकत्र येत सागदरा उपसा सिंचन योजना या नावाने संस्था रजिस्टर करून त्या माध्यमातून कुठलीही सरकारी आर्थिक मदत न घेता अंदाजे एक कोटी रक्कम खर्च करून ही योजना आज पूर्णत्वास नेली आहे. या सर्व शेतकऱ्यांसाठी बुधवार दि.25 डिसेंबर हा दिवस स्मरणात राहणारा आहे. या दिवशी पाणी शेवटच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर झालेला ‘सदा आनंदाचा येळकोट’ चा जयघोष केलेल्या कष्टाला फळ आल्याची साक्ष देत होते. प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या सातबारा उताऱ्यावरती जिल्हा बँकेच्या माध्यमातून कर्ज काढून ही योजना पूर्णत्वास नेली आहे. तसेच काही शासकीय यंत्रणा,भीमाशंकर सहकारी साखर कारखाना यांनी देखील इतर सहकार्य ही योजना पूर्ण करण्यासाठी केले आहे. शिवाय कॉन्ट्रॅक्टर, अधिकारी वर्ग तसेच इतर सर्वांच्या सहकार्याने आज हा दिवस उजाडला असल्याचे शेतकरी सांगत आहेत. सागदरा उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांनी आज ही जलक्रांती केली आहे. त्यांच्या या क्रांतिकारी कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मध्य रेल्वे पुन्हा विस्कळीत, कल्याणहून CSMT कडे जाणाऱ्या गाड्या उशिराने मध्य रेल्वे पुन्हा विस्कळीत, कल्याणहून CSMT कडे जाणाऱ्या गाड्या उशिराने
मुंबईची लाईफलाईन अशी ओळख असणाऱ्या मुंबई लोकलची सेवा विस्कळीत झाली आहे. मध्य रेल्वेवर काही तांत्रिक कारणामुळे सध्या लोकल वाहतूक उशिराने...
शिवडी किल्ला परिसरातील झोपडीधारकांचे पुनर्वसन करा, शिवसेनेची मुंबई पोर्ट ऑथॉरिटीकडे आग्रही मागणी
कॉ. कृष्णा मेणसे यांचे निधन, सीमा प्रश्नाच्या चळवळीतील ज्येष्ठ नेता हरपला
बदलापूर अत्याचार प्रकरण- पीडित मुली फारच लहान; खटला जलद गतीने चालवा, उच्च न्यायालयाने सरकारला सुनावले
उल्हासनगर न्यायालयात आणलेल्या आरोपीला चप्पलच्या बॉक्समधून गांजा
स्वयंविनियामक संस्थांतील प्रतिनिधींची दोन वर्षांसाठीच नियुक्ती, महारेराचा महत्त्वपूर्ण निर्णय  
सहा लाखांच्या नायलॉन मांजावर नागपूर पोलिसांचा बुलडोझर