हिंदी आपली राष्ट्रभाषा नाही, आर अश्विनच्या विधानावरून वाद
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला स्टार फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन सध्या चर्चेत आला आहे. चेन्नईतील एका महाविद्यालयाच्या कार्यक्रमात भाषण करताना अश्विनने हिंदी भाषेवर केलेल्या भाष्यामुळे वाद सुरू झाला आहे. हिंदी आपली राष्ट्रभाषा नसल्याचे वक्तव्य अश्विनने केले.
काय म्हणाला अश्विन?
चेन्नईतील एका अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना संबोधित करताना अश्विन म्हणाला की, हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा नाही. यावेळी भाषणादरम्यान अश्विनने विद्यार्थ्यांना विचारले की कोणाला हिंदीमध्ये प्रश्न विचारण्यात रुची आहे का? मात्र कुणीही हिंदी भाषेत प्रश्न विचारण्यात रुची दाखवली नाही. यानंतर अश्विन म्हणाला, मला वाटते की मी हे बोलले पाहिजे. हिंदी आपली राष्ट्रभाषा नाही, ती एक अधिकृत भाषा आहे.
अश्विनच्या या विधानामुळे पुन्हा एकदा भाषेवरून वाद निर्माण झाला आहे. अश्विनच्या वक्तव्यावर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया येत आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List