Santosh Deshmukh Case – आरोपी कोण आहेत हे सगळ्यांना समजलंय, त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे; धनंजय देशमुखांचं मुख्यमंत्र्यांना आवाहन

Santosh Deshmukh Case – आरोपी कोण आहेत हे सगळ्यांना समजलंय, त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे; धनंजय देशमुखांचं मुख्यमंत्र्यांना आवाहन

सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी जालन्यामध्ये आज आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या आक्रोश मोर्चात संतोष देशमुख यांचे कुटुंबीयही सहभागी झाले होते. यावेळी मोर्चात संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांना आवाहन केले आहे. आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, असे धनंजय देशमुख म्हणाले.

संतोष अण्णाचं काय चुकलं होतं? 20 वर्षे समाजकार्य केलं, कुटुंब उघड्यावर ठेवलं ते चुकलं होतं का? खूप चुकीच्या पद्धतीनं एका समाजसेवकाला एका कुटुंब प्रमुखालाच नव्हे तर एका गावच्या प्रमुखाला संपवलं. ही चुकीची घटना घडली. सगळ्यांना समजलंय कोण आरोपी आहेत. आजही सीआयडीच्या हाती एक व्हाईस सँपल मॅच झालं आहे. त्यामुळे हे कोण आरोपी आहेत, सगळ्यांना माहिती झालं आहे. जे राहिलेले आरोपी आहेत त्यांना अटक होऊन सगळ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी धनंजय देशमुख यांनी केली.

माझा जीव गेला तरी मी थोडंही मागे हटणार नाही. समाजाला एक आदर्श दाखवून दिल्याशिवाय मी थांबणार नाही. माझ्यासोबत तुम्ही राहा. सगळ्या समाजाला सोबत घेऊन चालताना माझ्या भावाला मोठं सुख भेटत होतं. त्याने आयुष्यात काहीच कमवलं नव्हतं. त्याच्याकडे एवढी संपत्ती होती जी की तुम्हा सगळ्यांना दिसतेय. त्याच्या मागे सगळा महाराष्ट्र उभा राहिला आहे, असे धनंजय देशमुख म्हणाले.

Santosh Deshmukh Case – संतोष देशमुखांसारखं त्यांच्या भावालाही मारून टाकायचंय का? गुंडांच्या धमक्यांवर मनोज जरांगेंचा इशारा

मानवाधिकार आयोगातही या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे. आयोगाचं पथक लवकरच बीडला येईल. मला जेवढं या प्रकरणात माहिती आहे, जे मुख्यमंत्र्यांना बोललो आहे ते आपण मांडून आपल्या भावाला न्याय घेतल्याशिवाय माघारी फिरायचं नाही. मुख्यमंत्रीसाहेब असं उदाहरण करून दाखवा की आपल्या शिव छत्रपतींच्या महाराष्ट्रात, शाहु, फुले, आंबेडकरांच्या विचारांच्या महाराष्ट्रात ही गुन्हेगारी खपवून घेतली जात नाही आणि गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा दिली जाते. आणि गुन्हेगारीला कसं मुळासकट संपवून टाकता येतं ही संधी आहे. ही मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, असे धनंजय देशमुख पुढे म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘राजकारणात उद्या काय होईल ते सांगता येईल का?’; उद्धव ठाकरे यांचं सूचक वक्तव्य?  ‘राजकारणात उद्या काय होईल ते सांगता येईल का?’; उद्धव ठाकरे यांचं सूचक वक्तव्य? 
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचं कामकाज कुठपर्यंत झालं हे पाहण्यासाठी...
शिवसेनाप्रमुखांनी आत्मचरित्र का लिहिले नाही…उद्धव ठाकरे यांनी दिले उत्तर
गौरी खानचं खरं नाव माहितीये का? गौरीनेलग्नावेळी शाहरूखचंही बदललं होतं नाव
वामिका-अकायसोबत विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या दर्शनाला; मागितली ‘ही’ गोष्ट
कोल्ड ड्रिंक्स प्यायल्याने कॅन्सर होतो का? जाणून घ्या
पाकला घेरलं; तालिबानचा सैन्याच्या चौक्यांवर हल्ला, अणु प्रकल्पातील 16 कामगारांचं अपहरण
मराठमोळ्या सायलीचे पदार्पण आणि टीम इंडियाची विजयी सुरुवात, आयर्लंडचा केला 6 विकेटने पराभव