लवकरच CBI मनीष सिसोदिया यांच्या घरावर छापा टाकणार; अरविंद केजरीवाल यांचा आरोप

लवकरच CBI मनीष सिसोदिया यांच्या घरावर छापा टाकणार; अरविंद केजरीवाल यांचा आरोप

दिल्ली विधानसभा निवडणूक जवळ येत असल्याने राजधानी दिल्लीत राजकीय वातावरण तापत आहे. आप आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. तसेच काँग्रसही या निवडणुकीत असल्याने त्यांच्याकडूनही आप आणि भाजपवर आरोप करण्यात येत आहेत. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी महत्त्वाचा दावा करत पुन्हा एकदा भाजप आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. येत्या काही दिवसांत माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरावर सीबीआय छापा टाकला जाणार असल्याचे केजरीवाल यांनी सांगितले आहे. या त्यांच्या खळबजनक दाव्यामुळे राजकारण तापले आहे.

या दाव्याबाबत त्यांनी एक्सवर पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, काही दिवसांपूर्वी आपण सांगितले होते की, दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांना अटक केली जाईल आणि आपच्या काही नेत्यांवर छापे टाकले जातील. आता विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळत आहे की, लवकरच CBI मनीष सिसोदिया यांच्या घरावर छापा टाकणार आहे. भाजपचा दिल्ली निवडणुकीत पराभव होत आहे. पराभव स्पष्ट दिसत असल्यामुळेच अटक आणि छापे टाकले जातील. आजपर्यंत त्यांना आमच्या विरोधात काहीही सापडले नाही, यापुढेही त्यांना काही सापडणार नाही. आम आदमी पक्ष हा प्रामाणिक पक्ष आहे, असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

आपल्याला माहिती मिळाली आहे की, आपच्या नेत्यांवर छापे टाकण्याचे आदेश CBI ला देण्यात आले आहेत. आपला निवडणूक प्रचारापासून रोखण्यासाठी भाजप डाव आखत आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांना खोट्या प्रकरणात अटक करण्याचा त्यांचा डाव आहे. तसेच माझ्यावर, मनीष सिसोदिया, संजय सिंह, सौरभ भारद्वाज आणि सत्येंद्र जैन यांच्या घरावरही धाड टाकण्यात येणार असल्याची माहिती आपल्याला मिळाली आहे. हे सर्व आरोप आणि जबाबदारीने करत असल्याचेही केजरीवाल यांनी स्पष्ट केले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

पोलीस डायरी – पप्पू कलानी, अरुण गवळीनंतर कोण? ‘बीड’ मधील सूत्रधारांचे काय ? पोलीस डायरी – पप्पू कलानी, अरुण गवळीनंतर कोण? ‘बीड’ मधील सूत्रधारांचे काय ?
>> प्रभाकर पवार एकोणीसशे नव्वदच्या दशकात उल्हासनगरातील ‘एका शाळेत एसएससी बोर्डाची परीक्षा सुरू असताना हरेश पटेल या गुंडाने आपल्या चार...
सोन्याप्रमाणे आता चांदीच्या दागिन्यांनाही हॉलमार्क
लक्षवेधक – कोल्ड्रिंक्सवरचा खर्च 24 टक्क्यांनी वाढला
काय सांगता! 6 मुलांची आई भिकाऱ्यासोबत पळाली; नवऱ्याची पोलीस स्टेशनमध्ये धाव
पालची खंडोबा यात्रा अपघाताविना आनंदात पार पाडा! जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे आवाहन
दहशतीसह विविध गुन्ह्यांत फरारी आरोपीला अटक, मोहोळ पोलिसांची कामगिरी; आरोपी शिंदे गटाचा माजी तालुकाप्रमुख
शेतकऱ्यांच्या ‘पांढऱ्या सोन्या’ ला भाववाढीची प्रतीक्षा