तिरुपतीमध्ये भक्तांच्या समूहाला रुग्णवाहिकेची धडक, दोन महिलांचा मृत्यू; तीन जखमी

तिरुपतीमध्ये भक्तांच्या समूहाला रुग्णवाहिकेची धडक, दोन महिलांचा मृत्यू; तीन जखमी

तिरुपतीमध्ये तिरुमला मंदिरात दर्शनासाठी चाललेल्या भाविकांच्या समूहाला 108 रुग्णवाहिकेने धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात दोन महिलांचा मत्यू झाला असून तीन जण जखमी झाले. चंद्रगिरी मंडळातील नरसिंगपुरमजवळ सोमवारी ही घटना घडली. अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. दाट धुक्यामुळे अपघात घडला असावा असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

पेड्डा रेडड्म्मा (40) आणि लक्षमम्मा (45) अशी मृत महिलांची नावे आहेत. तीन जखमी यात्रेकरूंना उपचारासाठी तिरुपती येथील रुईया रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मयत महिला अन्नमय जिल्ह्यातील रामापुरम मंडळातील चंपालापल्ली गावातील रहिवासी आहेत.

भक्तांचा समूह पुंगनूरहून भगवान व्यंकटेश्वराच्या तिरुमला मंदिराकडे चालला होता. यावेळी मदनपल्ले येथून तिरुपतीला रुग्ण घेऊन चाललेली रुग्णवाहिका भक्तांना धडकली. याप्रकरणी चंद्रगिरी पोलिसात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘मी राजीनामा मागणार नाही, दोषींना बिनभाड्याच्या खोलीत जावं लागेल’, सुरेश धस यांचं मोठं वक्तव्य ‘मी राजीनामा मागणार नाही, दोषींना बिनभाड्याच्या खोलीत जावं लागेल’, सुरेश धस यांचं मोठं वक्तव्य
भाजप नेते सुरेश धस यांनी बीड सरपंच हत्या प्रकरणावर माध्यमांना प्रतिक्रिया दिली. बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची गंभीर...
दुबईत साऊथच्या सुपरस्टारचा भयंकर अपघात, कारचे टप हवेत उडाले; व्हिडीओ पाहून हादरले फॅन्स
Pune News उसन्या पैशाच्या वादातून तरुणीची कोयत्याने वार करून हत्या
फडणवीसांसोबत नेमकी काय चर्चा झाली? मस्साजोगहून मुंबईत आलेल्या देशमुख कुटुंबियांचा खुलासा
गौरीची ‘ती’ अवस्था पाहून लग्नाच्या पहिल्याच रात्री शाहरूख खान ढसा ढसा रडला होता; असं काय घडलं होतं?
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी यशस्वी जैस्वालला मिळणार संधी? शमी-हार्दिकच्या पुनरागमनाचीही शक्यता
HMPV व्हायरसचे चीनमध्ये थैमान, वुहानमध्ये शाळा बंद; WHO ने अहवाल मागवला