अनिल कपूरने खास दिवशी दिली चाहत्यांना अनोखी भेट, ‘सुभेदार’ या नव्या सिनेमाची केली घोषणा
बॉलीवूड अभिनेते अनिल कपूर यांचा आज वाढदिवस असून आज ते 67 वर्षांचे झाले. यानिमित्ताने चाहते भरभरुन कौतुक करत आहेत. तर अनिल कपूर यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांसाठी विशेष भेट दिली आहे. आपल्या जन्मदिवसाच्या निमित्ताने आपला नवीन सिनेमा ‘सुभेदार’ची अनाऊन्समेण्ट केली आहे आणि फिल्म लूक समोर आले आहे.
अनिल कपूरचा अपकमिंग सिनेमा ‘सुभेदार’चा टीझर रिलीज झाला आहे. 1 मिनिट, 47 सेकंदाचा टीझर अनिल कपूर बसलेल्या घरातील एका दृश्याने सुरू होतो. हे घर दारावर टकटक करणारे आणि शिपायाला बाहेर येण्यास सांगत असलेल्या लोकांनी वेढलेले आहे. यानंतर अनिल कपूरचा लूक समोर येतो, ज्यामध्ये तो हातात बंदूक घेऊन खुर्चीवर बसलेला दिसतो. तो धारदार स्वरात म्हणतो – ‘सैनिक तयार.’ अनिल कपूर यांनी ‘सुभेदार’चा टीझर व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. यासोबत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहीले आहे की, एका खास दिवसासाठी एक खास अनाउंसमेण्टची गरज असते. ‘सुभेदार’ नवा सिनेमा लवकर येत आहे.
‘सुभेदार’मध्ये अनिल कपूरसोबत अभिनेत्री राधिका मंदाना महत्वाची भूमिका साकारणार आहे. सिनेमाला सुरेश त्रिवणी यांनी दिग्ददर्शन केले आहे आणि त्यांनी प्रज्वल चंद्रशेखर यांच्यासोबत मिळून लिहीले आहे. ‘सुभेदार’ प्राईम व्हिडीओवर रिलीज होणार आहे. याची रिलीज डेट समोर आलेली नाही.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List