लग्नाच्या 33 वर्षांनंतर गौरीने स्वीकारला इस्लाम धर्म? मक्कामधील फोटो पाहून चाहते अवाक्!
बॉलिवूडचा ‘बादशाह’ अर्थात अभिनेता शाहरुख खानने 25 ऑक्टोबर 1991 रोजी गौरी खानशी लग्न केलं. शाहरुख मुस्लीम असला तरी हे लग्न हिंदू विवाहपद्धतीनुसार पार पडलं होतं. या दोघांना आर्यन, सुहाना आणि अबराम ही तीन मुलं आहेत. शाहरुख आणि गौरीचं आंतरधर्मीय लग्न असलं तरी दोघं एकमेकांच्या धर्माचा आदर करताना आणि सर्व सण-उत्सव एकत्र साजरे करताना दिसतात. लग्नानंतर गौरीने धर्मांतर केलं नाही. मात्र आता सोशल मीडियावर शाहरुख आणि गौरीचा एक फोटो व्हायरल होत असून, त्यावरून गौरीने धर्मांतर केल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. हा फोटो मक्का इथला आहे. लग्नाच्या 33 वर्षांनंतर गौरीने इस्लाम धर्म स्वीकारल्याचं म्हटलं जातंय. या फोटोमध्ये शाहरुख आणि गौरी उमराहच्या लूकमध्ये दिसत आहेत. त्यांच्या मागे पाक खाना-ए-काबासुद्धा पहायला मिळतंय. त्यामुळे शारुखने गौरीला मक्का इथं नेऊन तिचं धर्मांतर केल्याच्या चर्चांना उधाण आलंय.
शाहरुख आणि गौरीच्या या फोटोवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. मात्र या फोटोंमागचं सत्य वेगळंच आहे. हे फोटो AI जनरेटेड असून पूर्णपणे फेक असल्याचं कळतंय. याआधीही अनेक सेलिब्रिटींचे AI जनरेटेड फेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता शाहरुख आणि गौरीसुद्धा त्याचेच शिकार झाले आहेत. याआधी सुशांत सिंह राजपूत-सारा अली खान, ऐश्वर्या राय-सलमान खान, विवेक ओबेरॉय-सलमान खान, सिद्धार्थ शुक्ला-शहनाज गिल यांचेही फेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
लग्नाआधीच गौरीने धर्मांतर न करण्याचा निर्णय घेतला होता. कॉफी विथ करणच्या पहिल्या सिझनमध्ये गौरी याबद्दल मोकळेपणे व्यक्त झाली होती. “आमच्यात योग्य संतुलन आहे. मी शाहरुखच्या धर्माचा आदर करते, पण याचा अर्थ असा नाही की मी धर्मांतर करेन. माझ्या मते प्रत्येकाला त्याच्या स्वत:च्या धर्माचं पालन करण्याचा अधिकार आहे आणि नात्यात एकमेकांविषयी आदर असायला हवा. शाहरुखसुद्धा कधीच माझ्या धर्माचा अनादर करत नाही. दिवाळीत मी पुजेला सुरुवात करते आणि सर्व कुटुंबीय मला फॉलो करतात. तर ईदला शाहरुख प्रार्थनेची सुरुवात करतो आणि सर्वजण त्याला फॉलो करतो. आमची मुलंसुद्धा दोन्ही धर्मांचा खुल्या मनाने स्वीकार करतात. दिवाळी आणि ईद दोन्ही त्यांना आवडतात”, असं ती म्हणाली होती.
2013 मध्ये ‘आऊटलूक’ला दिलेल्या मुलाखतीत शाहरुख म्हणाला, “कधीकधी मला माझी विचारतात की त्यांचा धर्म कोणता आहे? मग मी हिंदी चित्रपटातल्या हिरोसारखं त्यांना उत्तर देतो की, तुम्ही भारतीय आहात. तुमचा धर्मा हा माणुसकी आहे.”
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List