Allu Ajrun: चेंगराचेंगरीप्रकरणी अल्लू अर्जुनची चौकशी सुरू; अभिनेत्यावर पोलिसांकडून ‘या’ प्रश्नांचा भडीमार

Allu Ajrun: चेंगराचेंगरीप्रकरणी अल्लू अर्जुनची चौकशी सुरू; अभिनेत्यावर पोलिसांकडून ‘या’ प्रश्नांचा भडीमार

हैदराबादमधील संध्या थिएटरमध्ये ‘पुष्पा 2’ या चित्रपटाच्या प्रीमिअरदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेच्या मृत्यूप्रकरणी अभिनेता अल्लू अर्जुनची चिक्कडपल्ली पोलिसांकडून चौकशी केली जात आहे. जामिनावर सुटलेल्या अल्लू अर्जुनला पोलिसांनी चौकशीसाठी समन्स बजावले होते. त्यानुसार आज (मंगळवार) सकाळी 11 वाजता तो पोलीस ठाण्यात पोहोचला. चेंगराचेंगरीप्रकरणी पोलिसांकडून त्याची कसून चौकशी होणार आहे. 4 डिसेंबर रोजी संध्या थिएटरमध्ये ‘पुष्पा 2: द रुल’ या चित्रपटाच्या प्रीमिअरचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली होती. या प्रीमिअरला जेव्हा अल्लू अर्जुन पोहोचला, तेव्हा थिएटरबाहेर चेंगराचेंगरी झाली. त्यात एम. रेवती नावाच्या एका महिलेचा मृत्यू झाला. तर तिच्या नऊ वर्षांच्या मुलावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

4 डिसेंबर रोजी संध्या थिएटरमध्ये काय काय घडलं, याविषयी पोलीस अल्लू अर्जुनला प्रश्न विचारत आहेत. या चौकशीनंतर पोलीस त्याला संध्या थिएटरला घेऊन जाण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. अल्लू अर्जुन प्रीमिअरला त्याच्या बाऊन्सर्ससह पोहोचला होता. तेव्हा त्याच्या बाऊन्सर्सनी चाहत्यांना धक्काबुक्की केल्याचं समजतंय. याबद्दलही पोलिसांनी अभिनेत्याला सवाल केला आहे. अल्लू अर्जुनच्या चौकशीसाठी पोलिसांनी 20 प्रश्न तयार केले आहेत. जामिनावर बाहेर आलेल्या अल्लू अर्जुनने पत्रकार परिषद घेत त्याच्यावरील आरोप फेटाळले होते. त्याबद्दलही पोलीस त्याची कसून चौकशी करत आहेत. कारण त्याने ही पत्रकार परिषद नियमांविरुद्ध घेतल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी विधानसभेत संध्या थिएटरच्या घटनेवर प्रतिक्रिया दिल्यानंतर अल्लू अर्जुनने पत्रकार परिषद घेतली होती.

पोलिसांकडून अल्लू अर्जुनला विचारले जाणारे प्रश्न कोणते?

  • थिएटरमध्ये जाण्याविषयीची माहिती तू कोणाला दिली होतीस?
  • रोड शोसाठी तू परवानगी घेतली होती का?
  • रोड शोसाठी परवानगी नाकारल्याचं तुला कोणी कळवलं नव्हतं का?
  • थिएटरमध्ये तुझ्या कुटुंबातील कोण कोण आलं होतं?
  • थिएटरमध्ये असताना रेवती यांच्या मृत्यूबद्दल तुला समजलं होतं का?
  • एसीपी आणि सीआय यांनी तुझी भेट घेतली, हे खरं आहे की नाही?
  • तुझ्यासोबत किती बाऊन्सर्स आले होते?
  • चाहत्यांना धक्काबुक्की करणाऱ्या बाऊन्सर्सबद्दलची माहिती..
  • पत्रकार परिषदेत तू काही बोललास, त्या सगळ्याचा काय अर्थ आहे?
  • महिलेच्या मृत्यूबद्दल तुला कधी समजलं?
  • मध्यरात्री 2.45 वाजता तू थिएटरमध्येच होतास, हे खरं आहे की नाही?
  • 850 मीटरपर्यंत रोड शो का केला?
  • त्यानंतर निघताना तू सॅल्यूट का केलंस?

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

फडणवीसांचा शिलेदार अडचणीत? लक्ष्मण हाकेंनी सांगितलं वाल्मिक कराड यांचं धस कनेक्शन, मोठा दावा फडणवीसांचा शिलेदार अडचणीत? लक्ष्मण हाकेंनी सांगितलं वाल्मिक कराड यांचं धस कनेक्शन, मोठा दावा
छत्रपती संभाजीनगरमध्ये सकल ओबीसी समाजाच्या वतीनं  संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच निदर्शन आंदोलन करण्यात...
बाप-लेकीला सोडून दादांसोबत चला, शरद पवार गटाच्या खासदारांना तटकरे यांचा सल्ला?
‘अप्पी आमची कलेक्टर’मध्ये अप्पी-अर्जुनची राजकारण्यांशी लढाई; कथा रंजक वळणावर
‘तुम्ही इमर्जन्सी हा चित्रपट पहायला हवा’; कंगना यांचं ऐकताच प्रियंका गांधींनी दिलं असं उत्तर
रॅबिट फीव्हर म्हणजे काय? लक्षणे कोणती? जाणून घ्या
या लोकांसाठी ओला मटार म्हणजे विषासमान; चुकूनही खाऊ नका अन्यथा…
Video – अजितदादांच्या पक्षातील प्रमुख नेते साहेबांचा आदर करतात, तटकरेंचं सांगता येत नाही!