लक्षवेधी – नव्या वर्षात आदि कैलासला पोहोचणे होणार सोपे

लक्षवेधी – नव्या वर्षात आदि कैलासला पोहोचणे होणार सोपे

नव्या वर्षात उत्तराखंडमधील आदि कैलास आणि ओम पर्वत यासारख्या अवघड ठिकाणी आता पोहोचणे सोपे होणार आहे. उत्तराखंड सरकार आणि आयटीबीपी यांच्यात सामंजस्य करार झाला आहे. या करारामुळे हेलिकॉप्टर सेवेद्वारे पर्यटकांसाठी सोय आणि दुर्गम गावांसाठी आपत्कालीन सेवा पुरवली जाणार आहे. उत्तराखंडमध्ये पर्यटनाची अनेक ठिकाणे आहेत. यामुळे उत्तराखंड सरकार आणि इंडो तिबेट बॉर्डर पोलीस (आयटीबीपी) यांच्यात एक करार करण्यात आला आहे.

लय भारी! शिवाजी पार्कवर अवतरला ‘गोल्ड मॅन’

तुम्ही दादरच्या शिवाजी पार्कवर कधी फिरायला गेलात तर  तुम्हाला ‘गोल्ड मॅन’  दिसेल. गोल्डन वेशभूषा, डोक्यावर हॅट एकदम स्तब्ध… जणू एखादा पुतळाच. राहुल नट असे या 24 वर्षीय मुलाचे नाव आहे. तो शिवाजी पार्क परिसरात ‘गोल्ड मॅन’ म्हणून ओळखला जातो. राहूल मूळचा छत्तीसगढचा आहे. मागील तीन वर्षे राहुल शिवाजी पार्क येथे सकाळी 11 ते रात्री 9 वाजेपर्यंत उभा राहतो. राहुल उनवाऱ्याची पर्वा न करता पुतळा बनून राहतो. अनेकजण त्याच्यासोबत सेल्फी घेतात. कलेची दाद देऊन पैसे देतात.

पुष्पा-2 आमीर खानच्या ’दंगल’चा रेकॉर्ड मोडणार

अल्लू अर्जूनचा सुपरहिट ठरलेला पुष्पा-2 हा चित्रपट आमीर खानच्या दंगल चित्रपटाचा रेकॉर्ड मोडण्याची शक्यता आहे. पुष्पाने बॉक्स ऑफिसवर दबदबा निर्माण केला आहे. या चित्रपटाने अनेक चित्रपटांना मागे टाकले आहे. दंगल चित्रपटाने 2070 कोटींची कमाई केली असून हा चित्रपट आतापर्यंतचा सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट ठरलेला आहे. पुष्पाची कमाई 1760 कोटी रुपये झाली आहे. अजून काही दिवस हा चित्रपट सुरू राहिल्यास 2 हजार कोटींचा टप्पा पार करू शकतो.

 

गायक अरमान मलिक अडकला लग्नाच्या बेडीत

प्रसिद्ध गायक अरमान मलिक याने आशना श्रॉफ हिच्यासोबत लग्नगाठ बांधली. या लग्न सोहळ्याला कुटुंबातील व्यक्ती, जवळचे नातेवाईक आणि मित्रमंडळी उपस्थित होती. अरमान आणि आशनाने आपल्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करताना अरमानने कॅप्शनमध्ये लिहिले की, तू ही मेरा घर (तुम मेरा घर हो). विशेष म्हणजे हे चार शब्द अरमानच्या आगामी गाण्याच्या चार ओळी आहेत. लग्नानंतर अनेकांनी नवदांपत्यांना लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘या’ चुकांमुळे तुमच्या केसांची वाढ मंदावते, तज्ज्ञ उपाय जाणून घ्या ‘या’ चुकांमुळे तुमच्या केसांची वाढ मंदावते, तज्ज्ञ उपाय जाणून घ्या
केसांची वाढ योग्य पद्धतीने होणे हा अनेकांचा महत्वाचा विषय आहे. आजकालच्या धकाधकीच्या जीवनात चुकीच्या खानपानामुळे आरोग्याबरोबरच केसांवर देखील त्याचे वाईट...
आता लाल परिसाठी नो वेटिंग…, गर्दीलाही टाटा बाय- बाय, परिवहन मंत्र्यांचा प्रवाशांसाठी मोठा निर्णय
पोलिसांच्या 35 टीम सैफच्या हल्लेखोराला मुंबईभर शोधत होत्या, तो मात्र फक्त शर्ट बदलून पोलीस ठाण्याबाहेरच भटकत होता
‘धरतीपुत्र नंदिनी’ फेम अमन जैस्वाल यांचा वयाच्या 22 वर्षी अपघातात मृत्यू
Garlic: तुपात शिजवून नियमित खा लसूण, मग पाहा चमत्कारीक फायदे
प्रसिद्ध अभिनेता अमन जैस्वालचे अपघाती निधन, जोगेश्वरी पुलावर बाईकला ट्रकने उडवले
छत्रपती संभाजीनगरमध्ये माणूसकीला काळीमा फासणारा प्रकार, अपघातातील मृतांचे दागिने चोरले