स्वप्नील, सचिन, पेटकर, दीपाली; चार महाराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव
नेमबाज स्वप्नील कुसाळेने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकून महाराष्ट्राचा तब्बल 72 वर्षांचा ऑलिम्पिक पदकाचा दुष्काळ संपविला. त्याने पुरुषांच्या 50 मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये पदक जिंकले. कोल्हापूरच्या या सुपुत्राला अर्जुन पुरस्कार जाहीर झालाय. याचबरोबर आटपाडीच्या (जि. सांगली) सचिन खिलारीने पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये रौप्यपदकाची कमाई करीत 40 वर्षांनी देशाला गोळाफेकीत पदक जिंकून दिले. पुरुषांच्या गोळाफेकीतील एफ 46 प्रकारात पदक जिंकणाऱया या मराठमोळय़ा पट्टय़ालाही अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याचप्रमाणे हिंदुस्थानला पॅरालिम्पिकमध्ये पहिले सुवर्णपदक जिंकून देणारे जलतरणपटू मुरलीकांत पेटकर यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. त्यांनी 50 मीटर फ्रीस्टाईल प्रकारात हिंदुस्थानला सुवर्णपदक जिंकून देत इतिहास घडविला होता. याचबरोबर पॅरिस ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेता नेमबाज स्वप्नील कुसाळेच्या प्रशिक्षिका दीपाली देशपांडे यांनाही द्रोणाचार्य पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List