धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा निर्णय कधी? विखे पाटलांचं मोठं वक्तव्य

धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा निर्णय कधी? विखे पाटलांचं मोठं वक्तव्य

काही दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली. घटनेला 23 दिवस होऊन देखील अद्यापही या प्रकरणातील काही आरोपी फरार आहेत, त्यांना पकडण्यात पोलिसांना यश आलेलं नाही. त्यामुळे आता वातावरण चांगलंच तापलं असून, आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. दुसरीकडे याच प्रकरणात वाल्मिक कराडवर देखील आरोप करण्यात आले आहेत. घटनेच्या 22 व्या दिवशी तो सीआयडीला शरण आला. दरम्यान वाल्मिक कारड यांच्या जवळीकतेमुळे आता विरोधकांकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होऊ लागली आहे, विरोधकांकडून मुंडेंना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू आहे. यावर आता मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नेमकं काय म्हणाले विखे पाटील? 

जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज  श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन. घेतलं त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतान त्यांनी मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. एस आय टी चा अहवाल आल्यानंतर धनंजय मुंडे यांच्या राजीनामा बद्दल निर्णय होईल असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार हे दोन्ही नेते पुन्हा एकत्र येतील अशी चर्चा सुरू आहे, यावर देखील विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.  दोन पवार एकत्र यावे न यावे हा त्यांचा कौटुंबिक विषय आहे, कोणी काय साकडे घालावे त्यांची इच्छा, असं विखे पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान मंत्रिमंडळाच्या खातेवाटपावरून कोणीही नाराज नाहीये, जल संपदा खाते विभागून दिल्याने माझी नाराजी नाही या खात्यात काम करण्यास खूप वाव आहे, नदी जोड प्रकल्प, तसेच तुटीचे गोदावरी खोरे यात काम करण्यास चांगला वाव आहे, असंही यावेळी बोलताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List