Cabinet Portfolio Allocation: खातेवाटपात अजितदादांची दादागिरी की एकनाथ शिंदे यांचे वर्चस्व? वाचा संपूर्ण यादी

Cabinet Portfolio Allocation: खातेवाटपात अजितदादांची दादागिरी की एकनाथ शिंदे यांचे वर्चस्व? वाचा संपूर्ण यादी

Maharashtra Portfolio Allocation : महाराष्ट्रातील मंत्रिमंडळाचा विस्तार हिवाळी अधिवेशनाच्या एका दिवसापूर्वी झाला. त्यानंतर मंत्रिमंडळाची खातेवाटप हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर झाले. महायुतीमधील तिन्ही पक्षांत असलेल्या मतभेदांमुळे खाते वाटप रखडल्याचे सांगितले जात आहे. यामुळे आता खाते वाटपात अजित दादांची दादागिरी चालली की एकनाथ शिंदे यांनी वर्चस्व निर्माण केले? हा प्रश्न चर्चेत आला आहे. एकंदरीत खाते वाटपात तिन्ही पक्षांचे समाधान होईल, अशी खाती दिली गेल्याचे दिसत आहे. सर्वाधिक महत्वाचा गृहविभाग भाजपने आपल्याकडे ठेवला आहे. परंतु गृहविभागासारखे महत्वाचे असणारे गृहनिर्माण विभाग एकनाथ शिंदे यांना दिले आहे. अजित पवार यांनी त्यांच्या आवडीचे अर्थखाते दिले गेले आहे.

फडणवीस यांनी दिले होते संकेत

हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खाते वाटप करण्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी थोड्याच वेळात किंवा उद्या सकाळी खातेवाटप जाहीर होणार असल्याचे सांगितले. अखेर रात्री ९ वाजेच्या सुमारास खाते वाटप जाहीर करण्यात येणार आहे.

असे आहे खाते वाटप

  • देवेंद्र फडणवीस – गृह
  • अजित पवार – अर्थ
  • एकनाथ शिंदे – नगर विकास, गृह निर्माण
  • चंद्रशेखर बावनकुळे – महसूल
  • हसन मुश्रीफ – वैद्यकिय शिक्षण
  • चंद्रकांत पाटील – उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कामकाजमंत्री
  • गणेश नाईक – वन मंत्री
  • राधाकृष्ण विखे पाटील – जलसंपदा
  • पंकजा मुंडे – पर्यावरण व वातावरण बदल, पशुसंवर्धन
  • उदय सामंत – उद्योग व मराठी भाषा
  • गुलाबराव पाटील – पाणी पुरवठा
  • दादा भुसे – शालेय शिक्षण
  • गिरीश महाजन – जलसंधारण (विदर्भ, तापी, कोकण विकास), आपत्ती व्यवस्थापन
  • संजय राठोड – मृद व जलसंधारण
  • धनंजय मुंडे – अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण
  • मंगल प्रभात लोढा – कौशल्य विकास, रोजगार, उद्योग व संशोधन
  • जयकुमार रावल – विपणन, शिष्टाचार
  • अतुल सावे – ओबीसी विकास, दुग्धविकास मंत्रालय, ऊर्जा नुतनीकरण
  • अशोक उईके – आदिवासी विकास मंत्रालय
  • आशिष शेलार – माहिती तंत्रज्ञान, सांस्कृतिक
  • शंभुराज देसाई – पर्यटन, खाण व स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय
  • माणिकराव कोकाटे – कृषी
  • दत्तात्रय भरणे – क्रीडा व अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय
  • जयकुमार गोरे – ग्रामविकास, पंचायत राज
  • नरहरी झिरवाळ – अन्न व औषध प्रशासन
  • संजय सावकारे – कापड
  • संजय शिरसाट – सामाजिक न्याय
  • प्रताप सरनाईक – वाहतूक
  • भरत गोगावले – रोजगार हमी,फलोत्पादन
  • मकरंद पाटील – मदत व पुनर्वसन
  • नितेश राणे – मत्स्य आणि बंदरे
  • आकाश फुंडकर – कामगार
  • बाबासाहेब पाटील – सहकार
  • प्रकाश आबिटकर – सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण

 

राज्यमंत्री (State Ministers )

 

  • माधुरी मिसाळ – सामाजिक न्याय, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय, वैद्यकीय शिक्षण
  • आशिष जयस्वाल – अर्थ आणि नियोजन, विधी व न्याय
  • मेघना बोर्डीकर – सार्वजनिक आरोग्य, कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा
  • इंद्रनील नाईक – उच्च आणि तंत्र शिक्षण , आदिवासी विकास आणि पर्यटन
  • योगेश कदम – गृहराज्य शहर
  • पंकज भोयर – गृहनिर्माण

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

भाजप नेते रमेश बिधुरींचे वादग्रस्त वक्तव्य, दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशींना अश्रू अनावर भाजप नेते रमेश बिधुरींचे वादग्रस्त वक्तव्य, दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशींना अश्रू अनावर
प्रियांका गांधी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर आता दिल्लीतील भाजपचे उमेदवार रमेश बिधुरी यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी मार्लेना यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य...
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो राजीनामा देणार
कणकवलीत रेल्वे अभियंत्याची फसवणूक, केवायसीच्या नावाने खात्यातून काढले दीड लाख
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना मोठा दिलासा, योजनेबाबत नवी अपेडट काय?
HMVP व्हायरसचे तीन रुग्ण आढळले, आजाराचे प्रतिबंधक उपाय काय?, आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर
विद्या बालन रोहित शर्माबद्दल लिहायला गेली अन् अडचणीत सापडली; स्क्रीनशॉट व्हायरल; अनेकांनी झापलं
या वयोगटातील असाल तर त्वरीत या ५ सवयी सोडा, अन्यथा पश्चाताप होईल…